Dr Subhash Bhamre on Accident spot
Dr Subhash Bhamre on Accident spot Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

खासदार डॉ. भामरे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले

Sampat Devgire

धुळे : जुनवणे (ता. धुळे) (Dhule) येथून कार्यक्रम आटोपून परतताना खासदार डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamre) यांनी शनिवारी गरताडजवळ झालेल्या अपघातातील जखमींना मदतीसाठी धाव घेतली. स्वतःच्या कारमधून त्यांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करत मदतीचा हात दिला.

खासदार डॉ. भामरे यांच्या मदतीमुळे गंभीर जखमी तरुणाला वेळीच उपचार मिळाल्याने जीवदान मिळाल्याने त्यांच्यासाठी खासदार भामरे देवदूत ठरले. धुळे-चाळीसगाव मार्गावर गरताड शिवारात सकाळी जाताना ॲपे रिक्षा उलटल्याचे दिसले. मोठा अपघात झाल्याचे दिसताच खासदार भामरे यांनी थांबून रिक्षातील सात ते ८ महिला प्रवाशांची विचारपूस करत पाहणी केली. त्यात एक तरुण गंभीर जखमी होता. त्याचा हात फ्रॅक्चर तर डोके-पायाला गंभीर जखमा झाल्याने त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक दिसत होती. यामुळे विलंब न करता अपघातग्रस्तांना मदतीसाठी धाव घेणारे खासदार डॉ. भामरे यांनी घटनास्थळाहून तरुणाला स्वतःच्या कारमध्ये घेतले. तसेच पोलिसांसह आरोग्य अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत रुग्णवाहिका मागवल्या. गंभीर जखमी आणि बेशुद्धावस्थेतील तरुणाला ते जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले.

खासदार डॉ. भामरे स्वतः जखमीला घेऊन रुग्णालयात आल्याचे पाहून हिरे मेडिकलची यंत्रणाही त्वरित कामाला लागली. जखमींवर तातडीने उपचार सुरु केले. गंभीर जखमी तरुणाची तोपर्यंत ओळख पटली आणि तो तरुण भाजप नेते संजय शर्मा यांचा भाचा पंकज शर्मा असल्याचे स्पष्ट झाले.

जखमी पंकज शर्मासोबतच इतर जखमी महिलांनाही खासदार डॉ. भामरे यांनी हिरे मेडिकल कॉलेज रुग्णालयात योग्य ती उपचारांची सोय करून देण्याच्या सूचना दिल्या. आवश्यक ते औषधोपचार सुरु झाल्याची खात्री झाल्यावरच खासदार भामरे तेथून रवाना झाले. खासदार डॉ. भामरेंमुळे आपल्याला जीवदान मिळाले ते आमच्यासाठी देवदूत बनून आल्याचे भावपूर्ण उद्गार जखमी महिलांसह त्यांच्या नातेवाइकांनी काढत त्यांचे आभार मानले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT