Nilesh Lanke News : नगर जिल्ह्यात दुष्काळ असताना राज्य सरकारने दुष्काळी यादीत समावेश न केल्याने पारनेरचे आमदार नीलेश लंके चांगलेच आक्रमक झाले आहेत. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेत नगर जिल्ह्याची दुष्काळी परिस्थिती मांडण्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा आमदार लंके यांनी दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर आमदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेतली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या तीव्रतेची माहिती दिली. पाथर्डी, शेवगाव, पारनेर, श्रीगोंदे, नगर तालुका, राहुरी आणि जामखेडमध्ये दुष्काळ तीव्र असल्याचे आमदार लंके यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.
याशिवाय जिल्ह्यातील तालुकानिहाय दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्याची मागणी त्यांनी केली. आमदार लंके यांनी आकडेवारी दुष्काळाची स्थिती मांडल्यावर जिल्हाधिकारीदेखील अवाक् झाले.
''नगर जिल्ह्यात दुष्काळ तीव्र आहे. नगर दक्षिणमधील बहुतांशी भागात दुष्काळ आहे. तलाव, पाझर तलाव, शेततळे कोरडे पडले आहेत. काही भागात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. काही भागातून टॅंकरची मागणी होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती मांडणार आहोत. यानंतरदेखील सरकारने लक्ष न दिल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करू,'' असा इशारा आमदार लंके यांनी दिला. या वेळी आमदार लंके यांच्यासमवेत वकील राहुल झावरे, शिवाजी पाटील होळकर उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.