Sushma Andhare & Devyani Pharande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Vs Shivsena : अंधारे आणि फरांदेत जुंपली, फरांदे दाखल करणार हक्कभंग!

Sampat Devgire

MD Drugs Politics : ‘एमडी’ ड्रग्ज प्रकरणातील राजकारण थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यात रोज नवे ट्वीस्ट येत आहे. आता या प्रकरणात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची तयारी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे. (Drug Mafia Lalit Patil case, Politics between MLA Devyani Pharane & Shivsena`s Sushma Andhare)

यासंदर्भात ‘एमडी’ ड्रग्ज (Drugs) प्रकरणात ‘छोटी भाभी’च्या कार्यकर्त्यांशी संबंध जोडून आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती (Nashik) आमदार प्रा. देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी दिली.

शिवसेनेच्या अंधारे यांच्या नाशिक दौऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘एमडी’ ड्रग्ज प्रकरणाचा राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. यावेळी सत्ताधारी पक्षाचे मंत्री तसेच राजकीय नेत्यांवर टीका केली होती.

यासंदर्भात त्या म्हणाल्या, खोटे आरोप करून बदनामी केल्यामुळे हा हक्कभंग दाखल करणार आहे. अंधारे यांच्याकडे कुठलेही पुरावे नसताना त्यांनी माझी बदनामी केली आहे.

आमदार फरांदे या शिवसेना उपनेत्या अंधारे यांच्या विरोधात पुढील आठवड्यात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहेत. अंधारे यांनी नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या जाहीर सभेत देखील ‘एमडी’ ड्रग्ज प्रकरणात ‘मोठी भाभी’ असा उल्लेख केला होता.

त्यावर शुक्रवारी नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात आमदार फरांदे यांनी चर्चा घडवून आणली. आमदार फरांदे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करताना त्यांचे नाव न घेता ‘मोठी भाभी’ असे संबोधले होते. त्याचबरोबर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह आमदार फरांदे यांचा संबंध असल्याचा आरोप केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT