Jayant Patil NCP
Jayant Patil NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शरद पवारांवरील प्रेमाचे उतराई म्हणून सिन्नरला देणार पाणी

Sampat Devgire

नाशिक : सिन्नरला पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. (Sinner suffuring Water Shortage) शरद पवारांवर व राष्ट्रवादीवर सिन्नरकरांनी जे भरभरून प्रेम केले (They love Sharad Pawar & NCP) त्याचा उतराई व्हावा म्हणून लवकरच या भागाला पाणी देणार (Will give water to this area) असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (NCP leader Jayant Patil) यांनी दिले.

माणिकराव कोकाटे यांनी या भागाचा विकास करण्याचा ध्यास घेतला आहे, शासनातर्फे त्यांना संपूर्ण सहकार्य केले जाईल असा शब्दही जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

सिन्नरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार हे मला इथे प्रचाराला आलो तेव्हाच कळलं होतं. सिन्नरकरांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासास ते पात्र ठरत आहेत. सिन्नरचा झपाट्याने होणार विकास हे त्याचे उदाहरण आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादीकडे विधानसभा मतदारसंघ नाही तिथे कार्यकर्ते अनेक अन्याय सहन करूनही फक्त पवारसाहेबांवर असलेल्या प्रेमापोटी राष्ट्रवादीबरोबर आहेत. हे मी संपूर्ण महाराष्ट्रभर संवाद यात्रा काढत असताना पाहत आहे. त्यांना न्याय मिळावा, यासाठी त्यांच्यापर्यंत थेट जाऊन त्यांच्याशी संवाद साधत असल्याचे श्री पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार आले तेव्हा झोकून काम करायला सुरूवात केली होती. मात्र कोविड आला आणि राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून राज्याची आर्थिक घडी विस्कटू दिली नाही. राज्य सरकार प्रत्येक समाजघटकांसाठी काम करत आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण, मराठा समाजाचे आरक्षण या सर्व गोष्टींच्या बाजूने भूमिका मांडत आहे. सरकार चांगलं काम करतंय, सरकारची लोकप्रियता वाढली आहे म्हणून मंत्र्यांना बदनाम केले जात आहे.

यावेळी आमदार कोकाटे, आमदार दिलीप बनकर, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, उत्तर महाराष्ट्र विद्यार्थी अध्यक्ष विद्यासागर घुगे, जिल्हा युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष नंदन भास्करे, कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, युवक अध्यक्ष जयराम शिंदे, प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, प्रमोद सांगळे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT