Dugaon Gram Panchayat Receives ₹1 Crore Award  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : नाशिकच्या 'या' गावाने थेट १ कोटी जिंकले! मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात डंका

Dugaon Gram Panchayat Receives ₹1 Crore Award : नाशिकच्या दुगांव ग्रामपंचायतीने विभागस्तरीय स्पर्धेत थेट १ कोटी रुपयांचा पुरस्कार पटकावत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

Ganesh Sonawane

Dugaon Gram Panchayat wins ₹1 crore first prize under CM Samruddh Panchayatraj Abhiyan 2025-26 : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत नाशिक जिल्ह्याने विभागस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत यशाचा नवा टप्पा गाठला आहे. नाशिक विभागस्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धेत नाशिक तालुक्यातील दुगांव (पेसा) ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत १ कोटी रुपयांचा मानाचा पुरस्कार मिळविला आहे.

ग्रामविकास व पंचायत राज विभाग आणि जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० अंतर्गत विभागीय पुरस्कार वितरण सोहळा २०२५-२६ व 'सरपंच परिसंवाद – दुष्काळावर मात, समृद्ध गावाचा संकल्प' ही विभागीय कार्यशाळा अहिल्यानगर येथील नगर कल्याण रोडवरील द्वारका लॉन येथे आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात नाशिक विभागस्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारांतर्गत दुगांव ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचा १ कोटी रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशामुळे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामविकासाभिमुख कार्याला विभागस्तरावर विशेष गौरव प्राप्त झाला आहे.

ग्रामपंचायतीने लोकसहभागातून राबविलेली विकासकामे, प्रशासकीय कार्यक्षमता, विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले नियोजनबद्ध प्रयत्न हे या यशाचे महत्त्वाचे आधार ठरले आहेत.

या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दुगांव ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्वर गवे, उपसरपंच हरिभाऊ धोंडगे, शशिकांत वाघ, सदस्य कमल घोडे, पुष्पा जाधव, सदस्य, सागर गवे सदस्य, सुनिल थेटे, विष्णु वाघ, ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब बोराडे व कर्मचारी आणि ग्रामस्थांचे अभिनंदन केले असून, यापुढेही लोकसहभागातून गावांच्या सर्वांगीण विकासाची चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT