Durga Tambe Reply Amol Khatal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Durga Tambe Reply Amol Khatal : 'मी स्वातंत्र्यसैनिकाची कन्या; माझ्या रक्तात लोकशाहीचे संस्कार' : आमदार खताळांच्या हक्कभंगावर दुर्गा तांबेंचे जोरदार प्रत्युत्तर

Durga Tambe rejects privilege breach allegations, defends respect for legislature : विधानसभेचा अवमान केल्याचा आरोप फेटाळला; "चार पिढ्यांनी लोकशाही संस्थांचा सन्मान जपला, विधिमंडळ कालही पवित्र होते आणि कायम राहील" असा ठाम दावा

Pradeep Pendhare

Sangamner Politics : एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी, विधानसभेला अपवित्र म्हटल्याच्या आरोप करत, संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे ऊर्फ अंजली यांच्याविरोधात हक्कभंगाचे निवेदन सादर केलं आहे.

यावर दुर्गा तांबे यांनी आमदार खताळ यांना, मी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांची कन्या आहे. चार पिढ्यांनी लोकशाही संस्थानचा सन्मान जपला आहे. रक्तात लोकशाहीचे संस्कार आहेत, असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

संगमनेरमधील (Sangamner) 2009ची पाणीयोजनेत अनियमितता असल्याचा आरोप करत आमदार अमोल खताळ यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यावर माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे ऊर्फ अंजली यांनी आमदार खताळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

दुर्गा तांबे यांनी, समाज माध्यमांवर (Social Media) प्रतिक्रिया शेअर करताना, आमदार खताळ यांना ही तर संगमनेरची बदनामी असल्याचे म्हणत उत्तर दिले होते. या माध्यमांवरील व्हिडिओचा दाखल घेत, दुर्गा तांबे यांनी विधानसभेला अपवित्र म्हटल्याचा आरोप करत आमदार खताळ यांनी हक्कभंगाचे निवेदन दिले आहे.

आमदार खताळ यांच्या या हक्कभंगाच्या निवेदनावर, दुर्गा तांबे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आमदार खताळ यांचे आरोप फेटाळून लावत, लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या विधिमंडळाबद्दल माझ्या मनात कालही नितांत आदर होता, आजही आहे आणि आयुष्यभर राहील. चार पिढ्यांनी लोकशाही संस्थांचा सन्मान जपलेल्या आमच्या कुटुंबावर विधिमंडळाचा अवमान केल्याचा आरोप करणे अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी आहे, असेही दुर्गा तांबे यांनी म्हटलं आहे.

सभागृहाची प्रतिष्ठेचा अनुभव

मी स्वतः लोकांनी निवडून दिलेली संगमनेरची नगराध्यक्षा म्हणून तब्बल साडेबारा वर्षे सभागृह चालवले आहे. सभागृहाची प्रतिष्ठा, मर्यादा आणि परंपरा जपण्याचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. आपल्या कुटुंबाच्या लोकशाही परंपरेचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, मी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांची कन्या आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आणि महाराष्ट्र विधानसभेत सदस्य म्हणूनही काम केले आहे, याकडे लक्ष वेधलं.

आरोप चुकीचे अन् वेदनादायी

बंधू काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा दाखल देताना, त्यांनी चार दशकांहून अधिक काळ विधिमंडळात जनतेचा आवाज बुलंद केला. पती डॉ. सुधीर तांबे यांनी 14 वर्षे विधानपरिषदेत काम केले आणि आज मुलगा सत्यजीत तांबे विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडत आहे. अशा कुटुंबातील व्यक्ती विधिमंडळाचा अपमान करेल, असा आरोप करणे हे केवळ चुकीचेच नाही तर अत्यंत वेदनादायी आहे, असे दुर्गा तांबे यांनी म्हटलं आहे.

माझ्या रक्तात लोकशाहीचा आदर

विरोध करा, टीका करा, विचारांची लढाई लढा; पण जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ काढून एखाद्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे ही लोकशाहीची परंपरा नाही. माझ्या रक्तात लोकशाहीचा आदर आहे. माझ्या संस्कारात संसदीय सभागृहांचा सन्मान आहे. विधिमंडळ माझ्यासाठी कालही पवित्र होते, आजही पवित्र आहे आणि उद्याही पवित्रच राहील, असे सांगत त्यांनी आरोपांना ठाम उत्तर दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT