Shevgaon Bazar Samiti
Shevgaon Bazar Samiti Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shevgaon Bazar Samiti: शेवगाव बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे एकनाथ कसाळ तर उपसभापतीपदी गणेश खंबरे

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या पॅनलने 18 पैकी 18 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. त्यानंतर आज बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाची निवड झाली आहे.

शेवगाव बाजार समितीच्या सभापतीपदी एकनाथ कसाळ तर उपसभापतीपदी गणेश खंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सभापतीपदी आणि उपसभापतीपदी कुणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज अखेर ही निवड झाली आहे.

माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील आणि नरेंद्र घुले पाटील यांच्याकडून सभापतीपदासाठी एकनाथ कसाळ तर उपसभापतीपदासाठी गणेश खंबरे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते.

त्यानुसार कसाळ यांनी सभापतीपदासाठी आणि उपसभापतीपदासाठी गणेश खंबरे यांनी अर्ज भरला. या दोघांचेच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी १७ संचालक उपस्थित होते.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT