एकनाथ खडसे यांनी 2020 मध्ये भाजपच्या नेत्यांविरोधात 'सीडी' असल्याचा दावा केला होता, मात्र आता त्यांनीच कबुल केलं की सीडी त्यांच्या जवळ कधीच नव्हती.
ते म्हणाले की लोढा त्यांना सीडी देणार होता, मात्र ती मिळाली नाही, त्यामुळे त्यांच्या आरोपांची गंभीरता आता शंकास्पद ठरली आहे.
या कबुलीमुळे खडसेंची विश्वासार्हता आणि राजकीय प्रतिमा यावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Jalgaon News : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी 2020 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करताना आपल्याकडे भाजपचे नेत्यांची सीडी असल्याची जाहीर वाच्यता केली होती. मात्र त्यांचा सीडी बाबतचा आरोप हा फुसका बार ठरला आहे. त्यांची ती सीडी ही करप्ट झाली की काय? आता असेच म्हणावे लागणार आहे. त्याबाबत खडसेंनी स्वतःच आज कबुली दिलीय. सीडी आपल्याला लोढा देणार होता, असेही ते म्हणालेत. म्हणजे त्यांच्याकडे सीडी नव्हती व सीडी नाही आता हे स्पष्ट झाले आहे. मात्र सीडींच्या नावे बोंब उठून स्वतःच्या प्रतिमा व विश्वासार्हतेवरच त्यांनी प्रश्न निर्माण करून घेतले आहेत. (Eknath Khadse admits he never had BJP leader CD, raising questions on credibility and 2020 political allegations)
भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन या सीडी बाबत एकनाथ खडसे यांना जाहीर आव्हान दिले होते. तसेच अनेक प्रश्न उपस्थित करून समोरासमोर येण्याचे देखील आव्हान दिले होते. मात्र खडसे यांनी आव्हान न स्वीकारता शरणागती पत्करली असे दिसून येत आहे.
पत्रकारांनी सीडी बाबत विचारणा केली असता ती सीडी लोढा आपल्याला देणार होता असे यावेळी स्वतः कबुली देऊन ती सीडी नसल्याचा निर्वाळा त्यांनी यावेळी केला आहे. म्हणजेच एकनाथ खडसे यांच्याकडे अशी कोणतीही सीडी नसल्याची बाब आता स्पष्ट झाली आहे. त्यामुळे त्यांचा सीडीचा बॉम्ब हा फुसका ठरल्याचेच आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नुसता आरोप करून चर्चा घडवून आणायचे असेच असाच उद्देश खडसे यांचा होता की काय? असे या निमित्ताने आता विचारले जाऊ लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळी मोठ्या भीमगर्जनेमध्ये त्यांनी माझ्यामागे ईडी लावाल तर मी सीडी लावेन असे म्हटले होते. मात्र आता त्यांचा हा सीडीचा बॉम्ब फुसका ठरला असून सीडी करप्ट झाली आहे असेच आता म्हणावे लागेल. संपूर्ण राज्यात बरीच चर्चा यावर झाली होती नेमकी कोणत्या नेत्याची सिडी आहे याबाबत ही राज्यात उत्सुकता होती. मात्र आता स्वतः खडसेंनीच याबाबत जाहीर वाच्यता केल्याने त्यांच्या आरोपांवर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे.
1. एकनाथ खडसेंनी सीडी बाबत काय कबुल केलं?
– त्यांनी स्पष्ट केलं की त्यांच्याकडे सीडी नव्हती आणि ती लोढा देणार होता, पण मिळाली नाही.
2. सीडी प्रकरणात खडसेंवर काय आरोप आहेत?
– त्यांनी 2020 मध्ये भाजप नेत्यांविरोधात काही पुरावे असल्याचा दावा केला होता, जो आता खोटा ठरतोय.
3. या कबुलीमुळे काय परिणाम होऊ शकतो?
– त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर आणि प्रतिमेवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
4. लोढा कोण आहे आणि त्याचा या प्रकरणाशी काय संबंध?
– खडसे म्हणाले की, भाजपमधील लोढा नावाचा व्यक्ती त्यांना ही सीडी देणार होता, मात्र ती त्यांनी कधीच दिली नाही.
5. विरोधकांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे?
– अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नसली तरी सोशल मीडियावर खडसेंच्या कबुलीवर टीका होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.