NCP Leader Eknath Khadse in Police Station Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse: जळगावच्या पोलिसांनी संशयित आरोपींना पळवले!

दूध संघ गैरव्यवहाराच्या गुन्ह्यासाठी पोलिस ठाण्यात घडला ‘हाय होल्टेज ड्रामा’

Sampat Devgire

जळगाव : जिल्हा दूध उत्पादक (Jalgaon cooperative Milk Federation) संघात सव्वा कोटीची अफरातफर (1..25 cr. Fraud) केल्याप्रकरणी कार्यकारी संचालकांनी तक्रार दिली. मात्र पोलिसांनी (Police) गुन्हाच दाखल केला नाही. आता हे संशयीत आरोपी (Accuse are free) आता सापडत नाहीत. ते पळून गेले असावे. त्यामुळे एकप्रकारे पोलिसांनीच त्यांना पळवले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. (Eknath Khadse agitation against Jalgaon Police for FIR)

यासंदर्भात गुन्हा दाखल करावा यासाठी खडसे विरूद्ध त्यांचे राजकीय विरोधात असा रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे. खडसे यांनी काल गुन्हा दाखल करावा यासाठी दिवसभर पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तीथे जमले होते.

श्री. खडसे म्हणाले, कार्यकारी संचालक तक्रार घेवुन आल्यावर कालच पोलिसांनी तक्रार दाखल केली असती तर, तिन्ही मुख्य संशयित हातोहात घरी सापडले असते. आता मात्र, त्यांनी पळ काढला असून पोलिसांच्याच चुकीमुळे ते पळून गेलेआहे.

याबाबत पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर- पाटील आणि पोलिस महासंचालकांशी बोलणे झाले असून वरिष्ठ स्तरावर चर्चा करून याप्रकरणी निर्णय घेतला जाणार असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, गुन्हा दाखल झाल्याशिवाय हलणार नाही, अशी भूमिका खडसे यांनी घेतली. या ठिय्यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे यांनी पोलिस ठाण्यात भेट देऊन खडसेंसोबत पोलिस निरीक्षकांशी चर्चा केली.

जिल्हा दूध उत्पादक संघात १४ टन लोण्यासह दूध भुकटीची बेकायदेशीररीत्या विल्हेवाट सव्वा कोटीची अफरातफर केल्याप्रकरणी कार्यकारी संचालकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल न झाल्याने माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंनी गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. दुपारी ४ वाजेपासून पोलिस ठाण्यात दाखल खडसे रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते.

दरम्यान, याच प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी करण्यासाठी भाजपचे आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळेही दाखल झाल्यामुळे पोलिस ठाण्यातील वातावरण चांगलेच तापले.

खडसेंचा ठाण्यात ठिय्या

दूध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक लिमये यांना गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस दाद देत नाही म्हणून चेअरमन मंदाकिनी खडसे, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे ठिक चार वाजता शहर पोलिस ठाण्यात धडकले. निरीक्षक विजय कुमार ठाकुरवाड, उपविभागीय अधिकारी संदीप गावित, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी अशांनी या प्रकरणी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर एकनाथराव खडसे ठाम असल्याने रात्री साडेनऊ वाजेपर्यंत त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यातच ठाण मांडले होते. दरम्यान, रात्री साडेनऊ वाजता आमदार खडसे यांनी पोलिस ठाण्याबाहेर मंडप टाकून आपले आंदोलन सुरूच ठेवले.

असा आहे प्रकार

बुधवारी (ता.१२) दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज गोपाळ लिमये शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. पोलिसांनी त्यांची तक्रार न घेता मागील क्षुल्लक गुन्ह्यात जबाब नोंदवून घेतला, तसेच त्या जबाबाची प्रत त्यांना सुपूर्द केली. त्यात नमूद केल्याप्रमाणे ८ ऑक्टोबरला त्यांनी दूध संघातील विक्री विभागात कार्यरत संदीप झाडे, स्वप्नील जाधव, रवी वानखेडे, नितीन पाटील, महेंद्र केदार यांना स्टॉक तपासणीच्या सूचना केल्या होत्या.

त्यात असे निदर्शनास आले की, २ ऑक्टोबर २०२२ ला १४ टन पांढरे लोणी (अंदाजित किंमत ७० ते ८० लाख) संघाच्या बाहेर वाई (जि. सातारा) येथे शीतगृहात पाठविल्याची नोंद रजिष्टरमध्ये घेण्यात आली. प्रत्यक्षात असा कुठलाही माल बाहेर गेला नाही. तर, घट लपविण्यासाठी हा उपद्‌व्याप असल्याचे आढळून आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आर्थिक गुन्ह्यांमध्ये (ललिता कुमारी खटला) थेट गुन्हा दाखल करण्यापेक्षा तक्रारी अर्ज घेवून त्यावर सखोल चौकशीअंतीच गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाच्या सूचना आहेत. दूध संघाचे प्रकरण तत्काळ कारवाईसाठी बॉडी ऑफेन्स नाही. वरिष्ठांच्या सूचनेनुसार आलेल्या तक्रारींचे अवलोकन करून यावर कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल. यासंदर्भात आमदार खडसेंना लेखी पत्र दिले जाणार आहे.

- डॉ. प्रवीण मुंढे, पोलिस अधीक्षक, जळगाव

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT