Eknath Khadse, Girish Mahajan sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मला खडसेंचा राग नव्हे कीव येते ; महाजनांचा पलटवार

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सोशल मीडियावर वायरल होत आहे. यावरूनच गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी त्यांच्यावर टीका केली.

सरकारनामा ब्युरो

जळगाव : राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप नेते, माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील शाब्दीक युद्ध रंगले आहे. दोन्ही नेते एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. ''मास्तराच्या मुलाकडे एवढी संपत्ती कशी आली, त्याची चैाकशी करा,'' असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी नुकतीच केली होती. यावर महाजन यांनी त्यांनी प्रत्युत्तर दिलं.ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

''माझ्यावर आरोप झाल्यानंतर माझ्या संपत्तीची दहा वेळा चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांना काहीही सापडले नाही आणि सापडणारही नाही. आपल्या बापदाद्यांची संपत्ती आहे. आमचे वाडे होते, जमीन होती. त्यामुळे आमच्याकडे बापदाद्यांपासूनच मालमत्ता आहे, त्याची नोंदही आहे, मात्र, वडिल मास्तर असलेल्या मुलाकडे हजार, बाराशे कोटी रूपयांची मिळकत कोठून आली? याचीही चौकशी करावी," असा चिमटा गिरीश महाजन यांना खडसे यांनी काढला आहे. महाजन यांनी पुन्हा एकदा खडसेंवर निशाणा साधला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

गिरीश महाजन म्हणाले, ''मला खडसेंचा राग येत नाहीतर कीव येते. खडसेंचे मानसिक संतुलन बिघडलं आहे'' एकनाथ खडसे यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सोशल मीडियावर वायरल होत आहे. यावरूनच महाजन यांनी त्यांच्यावर टीका केली. महाजन यांनी खडसे यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र प्रसार माध्यमांसमोर दाखवत काही प्रश्न उपस्थित केले. अनेक प्रयत्न करून देखील सामान्य लोकांना अपंग प्रमाणपत्र लवकर मिळत नाही. एकनाथ खडसे यांना 70 व्या वर्षी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाले कसे? असा सवाल महाजन यांनी उपस्थित करत खडसे यांना धारेवर धरले.

महाजन यांनी खडसे यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र प्रसार माध्यमांसमोर दाखवत काही प्रश्न उपस्थित केले. अनेक प्रयत्न करून देखील सामान्य लोकांना अपंग प्रमाणपत्र लवकर मिळत नाही. एकनाथ खडसे यांना 70 व्या वर्षी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाले कसे? असा सवाल महाजन यांनी उपस्थित करत खडसे यांना धारेवर धरले.

दरम्यान एकनाथ खडसे यांना स्पायनलची शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना 60 टक्के अपंगत्व आले असल्याचे संबधित प्रमाणपत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच खडसेंच्या अपंग प्रमाणपत्राबाबत आपली हरकत नसून कदाचित त्यांना अपंगत्व आले असावे अशी मिश्किल टोलाही महाजन यांनी एकनाथ खडसेंना लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT