Eknath Khadse on Honey Trap  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse on Honey Trap : महाजनांशी संबंध आले अन् गरीब लोढा कोट्याधीश् झाला, एकनाथ खडसेंचे गंभीर आरोप

Eknath Khadse on Girish Mahajan and Prafulla Lodha : जामनेर तालुक्यातील संशयित प्रफुल्ल लोढा विरोधात मुंबईत पोस्को कायद्यांतर्गत बलात्कार आणि हनी ट्रॅपसंबंधी दोन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.

Ganesh Sonawane

Maharashtra politics : नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरण जळगावात पोहोचले असून, जामनेर तालुक्यातील संशयित प्रफुल्ल लोढा विरोधात मुंबईत पोस्को कायद्यांतर्गत बलात्कार आणि हनी ट्रॅपसंबंधी दोन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्या मालमत्तेची झडती घेतली आहे.

दरम्यान, लोढा याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. हे प्रकरण केवळ अधिकाऱ्यांपुरते मर्यादित नसून काही मोठे राजकीय नेतेही त्यात अडकल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.

नाशिकमधील बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणात ७२ अधिकारी आणि नेते अडकल्याची चर्चा सुरु असतानाच जळगाव जिल्ह्यातही हनीट्रॅप प्रकरण समोर आले. यामध्ये जामनेरच्या पहूर येथील मूळ निवासी असलेल्या प्रफुल्ल रायचंद लोढा यांच्याविरुद्ध ३ जुलै रोजी साकीनाका पोलिस ठाण्यात पोस्को, बलात्कार, खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे, तर १४ जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोस्कोअंतर्गत बलात्कार, हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकीनाका पोलिसांनी लोढा यांना ५ जुलै रोजी अटक केली आहे.

जळगावसह जामनेर आणि पोहूर येथील लोढा यांच्या मालमत्तांची तपासणी करून संबंधित काहीजणांचे इन कैमेरा जबाब नोंदवले आहेत. तसेच दुकाने खरेदी-विक्री व भाड्याने देण्याची चौकशी केली. या चौकशी दरम्यान, एक लॅपटॉप, दोन पेन ड्राईव्ह व काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केल्याचीही माहिती आहे. लोढा हे पूर्वाश्रमीचे आरोग्य दूत म्हणून ओळखले जात. लोढा हे एका मातब्बर नेत्याचे निकटवर्तीय होते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका चांगलाच चर्चेत आला आहे.

दरम्यान या प्रकरणात आता एकनाथ खडसे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी प्रत्यक्षपणे गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रफुल्ल लोढा आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे पूर्वापार घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. प्रफुल्ल लोढा यांच्याकडे आणखी काही महत्त्वाचे पुरावे आहेत. याप्रकरणात आणखी कोण कोण राजकीय व्यक्ती सहभागी आहेत, याबाबतचा सखोल तपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शकपणे करावा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

प्रफुल लोढा हा सात ते आठ वर्षांपूवी एक सामान्य कार्यकर्ता होता. आर्थिक दृष्ट्याही तो कमजोर वर्गातला होता. मात्र, अलिकडे काही वर्षात त्याचे गिरीश महाजन व काही राजकीय नेत्यांसोबत संबंध आले. त्या माध्यमातून तो आता पन्नास ते साठ कोटींचा मालक आहे असं म्हणतात. अचानक कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक कसा झाला? याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे खडसे म्हणाले.

मंत्री गिरीश महाजन हे प्रफुल्ल लोढा यांचे चांगले संबंध होते. त्यांच्यात पूर्वी खूप सख्य होते. बरेच दिवस ते सोबत राहीले, त्यांनी एकत्र काम केलं. परंतु, नंतर त्यांचे दोघांचे संबंध बिघडले. गिरीश महाजन व लोढा यांच्यात दुरावा निर्माण झाला. लोढा महाजन यांना अत्यंत खालच्या शब्दात शिवीगाळ करायला लागला, त्याचे व्हिडीओ व रेकॉर्डिंग पण आहेत. इतकी त्यांची टोकाची भूमिका झालेली होती. लोढा याने महाजन यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. याशिवाय भाजप पक्ष सोडला होता.

कालांतराने मंत्री महाजन यांच्याशी बिघडलेले संबंध सुधारल्याने लोढा यास पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. तेही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत. त्याच ठिकाणी गिरीश महाजन त्यांना पेढा भरवतानाचा फोटो आहे. अनेक कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या लोढाला भाजपमध्ये पुन्हा प्रवेश कसा मिळाला. गिरीश महाजन व त्यांच्यात टोकाचे वाद होऊनही ते पुन्हा एकत्र कसे आले याबाबतीतही खुलासा झाला पाहिजे, असं खडसे म्हणाले. कदाचित त्याने ब्लॅकमेल तर केलं नसेल असा सवाल खडसेंनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT