Eknath Khadse's Honey Bee therapy News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मधमाशीच्या दंशाने एकनाथ खडसेंची गुडघेदुखी संपली!

निसर्गोपचाराच्या या तंत्राने अतिशय अल्प खर्चात बरे होत आहेत.

Sampat Devgire

नाशिक : मधमाशीचा (Honey Bee) चावा भयंकर वेदना देणारा असतो. त्यामुळे त्याच्या कल्पनेनेच अनेकांना घाम फुटतो. मात्र तो एक निसर्गोपचार (Naturopathy) देखील आहे, यावर तुमचा विश्वास बसेल का. मात्र हे खरे आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गुडघेदुखीसाठी हा उपचार घेत आहेत. त्याचा त्यांना फायदा झाला. आता ते कोणाचाही आधार न घेता चालु लागले असल्याने हा उपचार बातमीचा विषय बनला आहे. (Eknath Khadse's honey bee therapy news)

खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील शेतमळ्यात त्यांनी नुकताच हा उपचार घेतला. `एपेक फ्युरा` या मधमाशीचा दंश देऊन उपचार त्यात केले जातात. डॅा कुलकर्णी यांच्या औरंगाबाद येथील फार्म हाऊस येथे देखील हे उपचार केले जातात. त्यांचे मार्गदर्शक असलेले डॅा नांदेडकर उरळी कांचन येथे उपचार करतात. त्यांनी आजवर २५ लाख रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत, असे त्यांनी सांगितले.

या उपचाराबाबत श्री. खडसे म्हणाले, माझी ही दुसरी थेरेपी आहे. मला चालताना त्रास होत होता. घुडग्यांचा त्रास होता. पाठ देखील दुखायची. वेदना व्हायच्या आणि कोणाचा तरी आधार घेतल्याशिवाय मला चालता येत नव्हते. उठता देखील येत नव्हते अशी स्थिती होती. त्यासाठी मी अनेक उपचार केले. कधी जोधपुरला गेलो. कधी केरळला गेलो. मुंबईत देखील उपचार केले. मधल्या कालखंडात व्हीलचेअरवर बसायची वेळ माझ्यावर आली होती. मात्र प्रयत्न करूनही त्यावर नीट उपर होत नव्हते.

ते पुढे म्हणाले, मधमाशी दंशाचा निसर्गोपचार मी घेतला. डॅा. कुलकर्णी तो करतात. त्यांचे वरिष्ठ सहकारी आहेत. पहिल्यांदा त्यांनीच माझ्यावर उपचार केले. सध्या डॅा. नांदेडकर यांनी उपचार केले. त्यातून मला जवळपास सत्तर ते ऐशी टक्के तरी फायदा झाला आहे. दुखणं तर बंद झालेच मात्र चालण्यातही बराचसा फरक पडला. आता मी कोणाच्याही आधाराशिवाय चालु लागलो. पायऱ्या देखील चढायला लागलो.

याबाबत डॅा. कुलकर्णी म्हणाले, पाठीचा कणा हा शरीराचा जंक्शन पॅाईंट असतो. त्यात माने पासून तर कंबरेच्या माकड हाडापर्यंत हा जंक्शन पॅाईंट असतो. त्याला आम्ही तीस सेकंद मधमाशीचा दंश करतो. त्यानंतर काही वेळ त्या माशीच्या दंशाने व्हेनम पहिल्या वेळी एक ते दोन मिनीटांचा वेळ लागतो. ही सेवा आहे. त्याचा फारसा खर्च येत नाही. या उपचारात डॅाक्टर मधमाशीच्या चाव्याचा एक रुपयाही घेत नाहीत. गुळवेल व अन्य औषधोपचार करतात. त्यासाठी ते दिडशे ते आठशे रुपये फी आकारतात. त्यामुळे गोरगरीब, सर्वसामान्य माणसाला त्याचा लाभ होऊ शकतो. काही वेळा ते मोफतही उपचार करतात. शेकडो रुग्ण येत असतात. उपचार घेत असतात. आजार जर जुनाट असेल तर त्याला आराम मिळण्यास थोडा कालावधी जातो. त्यासाठी पुन्हा तीन महिन्यांनी यावे लागते. दोन सेकंदांचा हा उपचार आहे. त्यात मधमाशीच्या माध्यमातून एक नैसर्गिक स्टीरॅाईट आपल्याला मिळते. त्याचा शरीराच्या वेदना बऱ्या होण्यास उपयोग होतो. त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीत.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT