EknathKhadse, gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra politics : गुलाबराव पाटलांना मंत्रीपदावरुन काढणार ? खडसेंनी सांगितलं कारण , 'जलजीवन मिशन योजनेत..'

सरकारनामा ब्यूरो

Jalgaon News : शिवसेनेच्या तब्बल पाच मंत्र्यांना भाजप हटवणार असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटातील नेते, खासदार संजय राऊत यांनी नुकताच केला आहे. या पाच मंत्र्यांना हटविण्याचा अहवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे भाजपच्या यंत्रणेने पाठविला आहे.

या पाच मंत्र्यांमध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा समावेश आहे.

या सर्व मंत्र्यांना कसे हटवायचे हा मोठा यक्षप्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे. या वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबाबत मोठा गंभीर आरोप केला आहे.

"गुलाबराव पाटील यांच्यावर जलजीवन मिशन योजनेत गैरव्यव्हार केल्याचा ठपका आहे. जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचाराचे रिपोर्ट दिल्लीमध्ये गेले असावेत," असा आरोप खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

एकनाथ खडसे म्हणाले, "गुलाबराव पाटील यांनी केलेल्या अनेक कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. त्यांचा रिपोर्ट दिल्लीला वरिष्ठांमध्ये गेलेला असल्यामुळे यांना काढा, अशी भाजपच्या वरिष्ठांनी भूमिका घेतलेली दिसते आहे. जलजीवन मिशनमध्ये पूर्णपणे कामे झालेले दिसत नाही. बराचसा गैरव्यवहार, भ्रष्टाचार त्यामध्ये झालेला आहे,"

“ हे पाचही मंत्री निष्क्रिय असल्याचे भाजपवाल्यांना वाटते. हे मंत्री भाजप कार्यकर्त्यांचं काम करत नाहीत. त्याचं त्यांच्याशी जमत नाही. त्यामध्ये आपले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हेही आहेत," असे खडसे म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT