उत्तर महाराष्ट्र

एकनाथ खडसेंचे विरोधक अडचणीत; उमेदवारीचे कागदपत्र निघाले बनावट

Sampat Devgire

भुसावळ : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Jalgaon district Bank Election) मुक्ताईनगर विकास सोसायटी गटात नाना पांडुरंग पाटील (Nana Pandurang Patil) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याविरोधात अर्ज दाखल केला होता. मात्र, भुसावळातील जय मातादी पतसंस्थेचे कर्ज थकबाकी असल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. यावर पाटील यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसांत तक्रार दिली होती. आता जय मातादी सोसायटीचे संचालक रईस खान लोधी यांनी नाना पाटील यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

मुक्ताईनगर विकास सोसायटी गटात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात नाना पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांना शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपने पुरस्कृत केले आहे. मात्र, तीन लाख ४९ हजार ७२६ रुपयांचे कर्ज थकीत असल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. या प्रकरणी नाना पाटील यांनी नाशिक विभागीय सहनिबंधक व पोलिसांकडे तक्रार दिली. आपण या पतसंस्थेचे सभासद व कर्जदार नसून, चेअरमन व सचिवांनी बनावट कागदपत्रे तयार करून आपल्याला थकबाकीदार दाखविल्याचा आरोप नाना पाटील यांनी केला आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी बाजारपेठ पोलिसांकडे अर्जाद्वारे केली होती.

नाना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी

जय मातादी पतसंस्थेचे संचालक रईस खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नाना पांडुरंग पाटील (रा. चिंचखेडे बुद्रुक, ता. मुक्ताईनगर) संस्थेचे कर्जदार आहेत. याबाबत एकनाथ खडके यांच्या मागणीवरून तसा थकबाकीचा दाखला त्यांना दिला आहे. असे असताना नाना पाटील यांनी त्यांच्याकडे संस्थेची कोणतीही थकबाकी नाही व ते संस्थेचे सभासद नाहीत, असा खोटा दाखला आमचे संस्थेचे बोगस लेटर पॅड तयार करून व खोटा शिक्का मारून, तसेच रईस खान व व्यवस्थापकाची खोटी सही करून जळगाव जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणीही केली आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT