Eknath Khadse & Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse Politics: खडसेंचा आरोप, `गिरीश महाजनांनी धरणाच्या नावाखाली पैसे लुटले`

जलसंपदा मंत्री महाजन यांच्या मतदारसंघात सिंचनाचा विकास खडसेंनी केल्याचा दावा- Eknath Khadse Politics Girish Mahajan forget help, He will be defeated.

Sampat Devgire

Khadse Vs Mahajan: जामनेर विधानसभा निवडणुकीची चुरस दिसू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांचे विरोधक एकत्र येऊ लागले आहेत.

मंत्री महाजन यांचे निकटवर्तीय भाजप नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा म्हणजे गिरीश महाजन यांच्या विरोधकांची मोर्चे बांधणी होती. यावेळी मंत्री महाजन यांना राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून थेट आव्हान देण्यात आले.

भारतीय जनता पक्षातीलच एक मोठा गट महाजन यांच्या विरोधात गेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठे बळ मिळाले आहे. यावेळी महाजन यांचे कट्टर विरोधक ज्येष्ठ नेते खडसे यांनी गिरीश महाजन यांचे अक्षरशः कपडे फाडले.

यावेळी श्री. खडसे म्हणाले, निवृत्त शिक्षकाचा मुलगा आहे म्हणून मंत्री महाजन यांच्यात थोडेफार संस्कार असतील, असे आम्हाला वाटत होते. पण हे महाशय तर भलतेच करामती निघाले. जीथे जीतील तीथे ते दूध काढतात. ते काय, काय करतात हे सबंध राज्याला माहिती झाले आहे.

ज्यांनी ज्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना मदत केली, त्यांनाच जमिनीत गाडण्याचे काम त्यांनी केले आहे. आज मतदार संघातील कार्यकर्त्यांना त्यांची भेट देखील होऊ शकत नाही. कोणतेही काम होत नाही. मतदार संघात विकास नाही. जळगाव औरंगाबाद रस्त्यावर रोज अपघातात लोकांचे मृत्यू होत आहेत.

या गंभीर समस्यांवर हे मंत्री महाशय बोलत नाही. यांच्या कामाचा नमुना म्हणजे राज्याचे ग्रामविकास मंत्री असलेल्या जामनेर पंचायत समितीची मुतारी देखील कुलूप लावून बंद केली आहे. जी व्यक्ती मुतारीची व्यवस्था करू शकत नाही, ती मतदारसंघाचा काय विकास करेल?

यावेळी खडसे यांनी कार्यकर्त्यांना यंदाची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. गेली सहा टर्म तुमच्या डोक्यावर बसलेल्या आणि सत्तेचा माज चढलेल्या व्यक्तीला घरी बसवण्याची ही संधी आहे. ही संधी आपण सोडू नये. यावेळी त्यांचा पराभव करूनच विश्रांती घ्यावी लागेल, असे सांगितले.

जामनेर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा होता. मनोहर पाटील येथून उमेदवार होते. त्यांच्या प्रचाराला देखील मी आलो होतो, असा दावा खडसे यांनी केला. पुढे हा मतदारसंघ भाजपने घेतला. त्या बदल्यात भुसावळचा मतदार संघ शिवसेनेला देण्यात आला. त्यातून गिरीश महाजन यांचा राजकीय जन्म झाला.

`या नाथाभाऊ मुळे महाजन राजकारणात जन्माला आला. याचा विसर त्यांना पडला आहे` असा दावा खडसे यांनी केला. ते म्हणाले, आता महाजन हे ज्यांनी त्यांना मदत केली, त्यांनाच संपवण्याची भाषा करतात. जामनेर मतदारसंघातील जनतेला ही मग्रुरी सहन होणार नाही. येत्या निवडणुकीत त्याची व्याजासकट परतफेड केली जाईल, असे आव्हान त्यांनी दिले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT