Eknath Khadse News : मी मंत्रीपद सोडून मोठा काळ लोटला. तेव्हा मी मंजूर केलेले सालबर्डी येथील अल्पसंख्याक समाजासाठीचे शासकीय तंत्रनिकेतनचे बांधकाम केव्हा पूर्ण होणार. त्यावर एव्हढी दिरंगाई का? यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. (Eknath Khadse pointed out delaying minority polytechnic building work)
अल्पसंख्याक समाजाचा विकास व्हावा, यासाठी आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे अल्पसंख्याक विकास मंत्री असताना त्यांनी मुक्ताईनगर (Jalgaon) तालुक्यात सालबर्डी येथे अल्पसंख्याक समाजासाठी शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालय मंजूर केले होते. त्याचे काम २०१८ पासून सुरू असून, गेल्या अनेक दिवसांपासून हे काम रेंगाळले आहे.
बुधवारी आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. हे काम ज्या अडचणीमुळे प्रलंबित आहेत, त्या अडचणी सोडवून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अल्पसंख्याक समाजासाठीचे हे पॉलिटेक्निक महाविद्यालय सुरू करण्याची मागणी केली.
अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावर उत्तर दिले. ते म्हणाले, की सालबर्डी शिवार मुक्ताईनगर येथील शासकीय अल्पसंख्याक तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालयाच्या इमारतीच्या काही भागाच्या बांधकामासाठी व परिसरातील नागरिकांसाठी रस्ता, यासाठी जागा उपलब्ध नसल्याने बांधकामाचा वेग मंदावला आहे. बांधकाम अपूर्ण अवस्थेत असल्याने, चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरु करणे शक्य नाही, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.