Girish Mahajan & Eknath Khadse
Girish Mahajan & Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

एकनाथ खडसेंना सर्व पदांवर आपले कुटुंबीच हवेत!

Sampat Devgire

जामनेर : नगराध्यक्षपद (Jamner) कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच पत्नी साधनाने स्वीकारले. तुम्ही तर तुमच्या घरातील एकाही सदस्याला पदापासून दूर ठेवलेले नाही. गेल्यावेळी दूध संघाचे (Milk fedration) चेअरमनपद एक वर्षासाठी ठरले असताना, ते त्यांनी सोडले नाही. सर्वच ठिकाणी माझे कुटुंब पाहिजे, अशी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची भूमिका राहिली आहे. आता दूध संघाच्या निवडणुकीत त्यांनी विजयी होऊन दाखवावे, असे आव्हान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आमदार एकनाथ खडसे यांना दिले. (Girish Mahajan given Challange to Eknath Khadse for milk fedration election)

दरम्यान राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा एकदा स्थगिती दिली आहे. त्यामुळे जळगावमध्ये जिल्हा दूध संघाच्या निवनडणुकीमुळे तापलेले वातावरण आता काही काळ निवळणार आहे.

दूध संघाच्या मेळाव्यात सभासदांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आमदार संजय सावकारे, स्मिता वाघ, अरविंद देशमुख, तुकाराम निकम, जे. के. चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, शिवाजी सोनार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मंत्री महाजन म्हणाले, की त्यांच्या नशिबाचे भोग ते भोगतील, मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. सत्ता असताना वाटेल ते केले. आम्ही तसे करणार नाही. सत्तेचा उन्माद बरा नाही. मला हा विषय संपवायचा आहे. नोटबंदी काळात तुम्ही काय केले, हे सर्व जाणून आहेत. मला जास्त बोलायला लावू नका, असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला.

निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांना कळेलच, असे सूचक इशाराही त्यांनी दिला. आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, की खडसेंनी वयाची सत्तरी गाठली आहे. त्यामुळे त्यांनी बोलताना सांभाळून बोलले पाहिजे. त्यांच्या बोलण्यात ‘मी’ पणा आहे. संजय पवार यांनीही आपली भूमिका मांडली. मेळाव्यास तालुक्यातील दूध संघाचे सदस्य उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT