Girish Mahajan & Eknath Khadse
Girish Mahajan & Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse: खडसे आक्रमक, सलीम कुत्ता प्रकरणी गिरीश महाजनांची एसआयटी ...

कैलास शिंदे :सरकारनामा ब्युरो

Jalgaon News : दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ताच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे.

खडसे म्हणाले, दाऊद इब्राहिमच्या बायकोबरोबर माझे संभाषण झाले. अशा स्वरूपाचा आक्षेप माझ्यावर लावण्यात आला होता. त्यावेळी माझी चौकशी लावण्यात आली, चौकशीत कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले. कारण त्या ठिकाणी कोणताही पुरावा नव्हता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परंतु, आता दाऊदचा साथीदार सलीम कुत्ताबरोबर त्या पार्टीत गिरीश महाजन असल्याचा पुरावाच समोर आला आहे. त्याच्यासोबत महाजन यांचे फोटोच प्रसिद्ध झाले आहेत. देशद्रोही व्यक्तीबरोबर संबंध असल्याचा आरोप तुम्ही सुधाकर बडगुजर यांच्यावर करता आहात त्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली जाते आहे.

मग राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या बरोबर सलीम कुत्ताही फोटोत दिसतो आहे. ते पार्टीत उपस्थित असल्याचे फोटोतून स्पष्ट झाले आहे, त्यामुळे गिरीश महाजन यांचे देशद्रोहीसोबत संबंध आहेत काय ? याची चोकशी झाली पाहिजे अशी आपली मागणी असल्याचे खडसे म्हणले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT