Maharashtra politics : राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचाराचा धुराळा सध्या उडतो आहे. त्यापार्श्वभूमीवर नेत्यांच्या सभांनी राजकीय पारा चढला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या नेत्यांकडून सभांमधून विकासाची आश्वासने दिली जात आहेत. वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपरिषदेत शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हितेंद्र क्षत्रिय व अन्य नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. तळोदा येथील आनंद चौकात गुरूवारी (ता. २७) ही सभा झाली. या सभेत एकनाथ शिंदे यांनी तळोदा शहत दत्तक घेतल्याची घोषणा केली.
सभेला संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले, आजची सभा ही परिवर्तनाची लाट असून, शिवसेनेचा विजयाची नांदी आहे. तळोद्यातील विकासाच्या मारेकऱ्यांना येत्या दोन तारखेला गाडून टाका. तळोद्याला आजपासून मी दत्तक घेतो आहे अशी घोषणा त्यांनी केली. शिवसेनेला साथ द्या निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन त्यांनी तळोदा वासियांना दिले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी डोळ्यांनी गरिबी बघितली आहे. त्यामुळे मला गरिबांबाबत आस्था आहे. देशामध्ये जहागिरीदारी संपली आहे. मात्र, तळोद्यात ती आजही सुरू आहे. त्यामुळे तळोद्याला जहागिरीदारीच्या पाशातून मुक्त करणार आहे. नगरविकास खात्याच्या माध्यमातून तळोद्यातील कचरा डेपो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे. दोन तारखेला धनुष्यबाणाला मतदान करीत विरोधकांना भुईसपाट करा. तीन तारखेला मी विजयोत्सव साजरा करण्यासाठी तळोद्याला येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, जिल्हाप्रमुख राम रघुवंशी, जिल्हाप्रमुख गणेश पराडके, उपजिल्हाप्रमुख गौतम जैन, नंदुरबार लोकसभा नंदुरबार अध्यक्ष ललित जाट, लोकसभा उपाध्यक्ष संदीप परदेशी, निखिल तुरखीया, वतनकुमार मगरे, शिवाजी पराडके, केसरसिंग क्षत्रीय, डॉ. दिनेश खरात, हर्षिल तुरखिया, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हितेंद्र क्षत्रिय व सर्व नगरसेवक पदांचे उमेदवार उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.