Uddhav Thackeray & CM Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे यांनी कोणाला हिणवले, "आम्ही हप्ते देतो, घेत नाही"

CM Shinde criticize Uddhav Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे.

Sampat Devgire

Mumbai News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारने राबविलेल्या योजना विरोधी पक्ष बंद करण्याच्या वल्गना करीत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे, अशी टीका केली.

पारोळा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार अमोल पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची प्रचार सभा झाली. यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे पक्ष हा समाजासाठी काम करणारा पक्ष आहे. शिल्लक राहिलेली शिवसेना ही फक्त सत्तेसाठी काम करणारी आहे. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत धडा शिकवावाच लागेल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिकेचा भडीमार केला. या प्रचारात महाविकास आघाडीचे नेते सांगण्यासारखे काहीही नसल्याने महायुतीवर आणि मुख्यमंत्र्यांवर अवाजवी टीका करतात. ही टीका करण्याचे कारण म्हणजे, त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत. जनतेसाठी काय करणार याचे त्यांच्याकडे उत्तर नाही.

त्याचे विरोधक हे केवळ आम्ही सत्तेत आल्यावर महायुती सरकारच्या योजना बंद करू, हे सांगत आहेत. मात्र जनतेने घाबरून जाऊ नये. आम्ही लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेचे महत्त्व प्रत्येक महिलेला समजले आहे. या महिलांना आम्ही एक महिन्याचा हप्ता आधीच वर्ग केला आहे. नव्याने पुन्हा आपले सरकार येणार आहे. तेव्हा त्यात आणखी वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला.

राज्यातील महायुतीचे सरकार समाजासाठी आणि महिलांसाठी उत्कृष्ट काम करीत आहे. त्यांनी युवकांना महिलांना शेतकऱ्यांना मदतीचे हप्ते दिले आहेत. त्यामुळे आमचे सरकार हफ्ते घेणारे नाही. आम्ही हप्ते घेत नाही, हप्ते देतो, असे त्यांनी विरोधकांना सुनावले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवून काँग्रेसची युती केल्याची टिका त्यांनी केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण गहाण ठेवला होता. आम्ही तो मुक्त करून स्वाभिमानाने तो मिरवत आहोत. सत्तेसाठी तडजोड, हे आमचे धोरण नाही.

शिवसेना पक्षाचे उद्धव ठाकरे हे फक्त सत्तेचा विचार करीत आहेत. पुन्हा सत्तेवर येण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. मात्र जनतेच्या योजना बंद करण्याच्या व लग्न करणारे आणि शिवसेनेचे धनुष्यबाण गहाण टाकणारे उद्धव ठाकरे यांचा समाचार घेण्याची आता वेळ आली आहे. येत्या निवडणुकीत लाडक्या बहिणींनी त्यांना घरी बसवावे.

माजी आमदार चिमणराव पाटील हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी कष्ट घेतले. त्यांना आम्ही पुरेपूर मदत केली. या मतदारसंघात तीन हजार कोटींचा निधी सरकारने दिला आहे. आगामी काळातही मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही सर्व अमोल पाटील यांच्या पाठीशी उभे राहू. जनतेने त्यांना आशीर्वाद देऊन आमदार करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या या सभेत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, खासदार स्मिता वाघ, उमेदवार अमोल पाटील आदींनी महायुतीचा अजेंडा मांडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT