Anil Kunde
Anil Kunde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Niphad Politics: शिवसेनेच्या आरोपांविरोधात शिंदे गटाने उपसले उपोषणाचे अस्त्र!

Sampat Devgire

निफाड : निफाड (Niphad) नगरपंचायतीत कसलाही अनागोंदी कारभार किंवा भ्रष्टाचार नसून माजी नगराध्यक्षांकडून (Shivsena) निफाड शहराची बदनामी केली जात आहे. त्यांनी आपल्या आरोपांचे पुरावे सादर न केल्यास त्यांच्या निषेधार्थ आपण स्वतः उपोषणाला बसणार असल्याचा इशारा विद्यमान नगराध्यक्ष कांताबाई कर्डिले, एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) तालुका अध्यक्ष उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, आरोग्य समितीचे सभापती साहेबराव बर्डे यांसह नगरसेवकांनी दिला. (Eknath Shinde group & Shivsena politics on corruption issue of Niphad)

निफाडच्या माजी नगराध्यक्ष रूपाली रंधवे यांनी नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन निफाडमध्ये अनागोंदी व भ्रष्टाचार सुरू असून तात्काळ संबंधितांवर कारवाई न झाल्यास प्रजासत्ताक दिनी उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत वस्तुस्थिती मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यावेळी उपनगराध्यक्ष कुंदे आणि सभापती बर्डे यांनी स्पष्ट केले, की हे आरोप संपूर्णपणे निराधार आणि चुकीचे आहेत. संपूर्ण शहराची बदनामी करणारे आहेत. गावात कोठेही कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले नाही आणि तरीही कोठे कचरा अस्वच्छता आढळून आल्यास नागरिकांनी, नगरसेवकांनी तत्काळ नगरपंचायतीला सूचित करावे. त्यांच्या समस्या तत्काळ सोडवण्यास आम्ही तत्पर आहोत.

सौ. रंधवे यांच्याच कार्यकाळात साफसफाईचा ठेका देण्यात आलेला असून, त्यांच्या कार्यकाळात जी बिले अदा केली जायची, त्याच पद्धतीने आजही ठेकेदाराला बिले अदा केली जात आहेत. वास्तविक पाहता ठेका हा ऑनलाइन टेंडर पद्धतीने, पारदर्शक व सर्वात फायदेशीर बोलीवरच देण्यात आलेला आहे, त्यामुळे नगरपंचायतीचा आर्थिक लाभ झालेला आहे.

ठेकेदाराला नगरपंचायतीकडून वाहने ही भाड्याने दिली जात असल्याने तेथे नगरपंचायतीला आर्थिक उत्पन्न मिळत असते. कचरा संकलित करताना पारदर्शक कारभारासाठी नागरिकांच्या सह्या घेतल्या जातात. ही सर्व वस्तुस्थिती असताना देखील केवळ स्वतःच्या राजकीय लाभासाठी आणि शहराच्या विकासात अडथळे आणण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत. हे निषेधार्थ असून संबंधितांनी केलेल्या आरोपांचे पुरावे सादर न केल्यास आम्हालाही जाहीर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा त्यांनी दिला.

नगराध्यक्ष कांताबाई कर्डीले, उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, स्वच्छता आरोग्य व शिक्षण सभापती साहेबराव बर्डे, पाणीपुरवठा सभापती संदीप जेउघाले, नगरसेवक किशोर ढेपले, नगरसेविका डॉ. कविता धारराव, डॉ. सविता तातेड, शारदा कापसे, अलका निकम, संदीप शिंदे तसेच देवदत्त कापसे, आसिफ पठाण, डॉ. नितीन धारराव, हरीश कर्डीले, मोहन जाधव, सोमनाथ निकम आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT