Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik; नगरसेवक प्रवेशावरून शिंदे गट तोंडावर पडला!

Sampat Devgire

नाशिक : उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेला (Shivsena) जय महाराष्ट्र करत बाळासाहेबांची शिवसेना (Eknath Shinde) अर्थात शिंदे गटातील प्रवेशकर्त्या माजी नगरसेवकांचा (NMC) प्रवेशाचे सस्पेन्स सतत वाढले आहे. शोध घेऊनही हे नगरसेवक, त्यांची नावे कळत नसल्याने शिंदे गटाची चांगलीच नाचक्की झाली आहे. ठाकरे गटाच्या भक्कम बंदोबस्तामुळे शिंदे गटहवालदील झाल्याचे चित्र आहे. (Eknath Shinde group fail to attract Shivsena corporators in Nashik)

शिवसेनेचे बारा नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार अशी बातमी शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पसरवली होती. एकगठ्ठा बारा नगरसेवक शिवसेना सोडणार असल्याची त्याची चर्चा झाली. त्या दिवशी मुख्यमंत्री आसाममध्ये कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. त्यांच्या समवेत असणाऱ्यांनी विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनीही याबाबत अनभिज्ञता दर्शवली होती.

हे बारा नगरसेवक कोण? याची नावे संकलीत करण्याचे काम केल्यावर खुप ताण देऊनही दोन नावांपलिकडे संख्या जात नव्हती. अत्यंत सामान्य व शाखांच्या स्तरावर कार्यरत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन खासदार हेमंत गोडसे गेले काही दिवस त्यांना शिंदे गटात येण्यासाठी मधाचे बोट लावत आहेत. हे कार्यकर्ते लगेचच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देत असतात. त्यामुळे शिंदे गटाला प्रयत्न करूनही मोठे यश अद्याप नाशिकला मिळालेले नाही.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी वर्षा निवासस्थानी बारा नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणरा होते. मात्र तसे होण्याआधीच हे नगरसेवक अदृष्य झाले असावेत, अशी प्रतिक्रीया स्थानिक नेत्यांनी दिली आहे. एकंदरच सतत शिवसेनेच्या नगरसेवकांना आकर्षित करून पक्षात घेण्याची धडपड शिंदे गटाचे नेते घेत आहेत. मात्र शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आपसातील ताळमेळ, घट्ट समन्वय यातून शिंदे गटाला अद्याप यश आलेले नाही. पालकमंत्रीपद, एक खासदार, एक आमदार एव्हढी शक्तीस्थळे असूनही शिंदे गट नाशिकमध्ये प्रभाव दाखवू शकलेला नाही हा शिक्का शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर यानिमित्ताने बसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT