Chandrakant Raghuwanshi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबारला पुन्हा फडकला एकनाथ शिंदेंचा झेंडा!

धडगावला संख्याबळअभावी कॉंग्रेसची माघार झाल्याने एकनाथ शिंदे गटाची सरसी.

Sampat Devgire

नंदुरबार : नंदुरबार-धडगाव (Nandurbar) पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेनेने (शिंदे गट) (Eknath Shinde Group) वर्चस्व मिळविले. नंदुरबार पंचायत समितीत बहुमताने, तर धडगाव पंचायत समितीची निवड बिनविरोध झाली. पंचायत समितीच्या उर्वरित अडीच वर्षांसाठी सभापती-उपसभापतिपदाची निवडणूक गुरुवारी झाली. (Congress walkout and Eknath Shinde Group`s candidate wins in Nandurbar)

भाजपतर्फे मालतीबाई गावित व शिवसेनेतर्फे माया माळसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपसभापतिपदासाठी भाजपचे करण भिल व शिवसेनेतर्फे शीतल परदेशी यांनी अर्ज दाखल केले. हात उंचावून मतदान प्रक्रियेसाठी भाजपचा एक सदस्य गैरहजर होता. त्यामुळे भाजपचे आठ, शिवसेनेचे आठ व कॉंग्रेसचे तीन, असे १९ सदस्य उपस्थित होते.

सभापतिपदासाठी शिवसेनेच्या माया माळसे यांना ११ मते मिळाली, तर उपसभापतिपदासाठी शीतल परदेशी यांनाही ११ मते पडली. त्यामुळे भाजपचा पराभव करून बाळासाहेबांच्या शिवसेनेने आपले वर्चस्व मिळविले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी काम पाहिले.

धडगावला बिनविरोध निवड

नंदुरबार पंचायत समितीपाठोपाठ धडगाव पंचायत समितीवरही शिवसेने (शिंदे गट)चा झेंडा फडकला. सभापतिपदी हिराबाई पराडके यांची, तर उपसभापतिपदी भाईदास अत्रे यांची बिनविरोध निवड झाली. १४ सदस्‍यांच्या धडगाव पंचायत समितीत शिवसेनेचे आठ, तर कॉंग्रेसचे सहा संख्याबळ आहे. त्यामुळे गुरुवारी झालेल्या सभापती-उपसभापती निवडणुकीत कॉंग्रेसने अर्ज दाखल न केल्याने शिंदे गटाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.

विकासाचे व्हीजन ठेवून कामे करणार

संपत्तीच्या जोरावर नंदुरबार पंचायत समितीच्या ताबा मिळविण्याच्या प्रयत्न झाला. मात्र, निष्ठावान सदस्यांनी थारा न देता शिंदे गटाच्या झेंडा फडकवला. तालुक्यात विकासाचे व्हीजन ठेवून सदस्य जबाबदारीने कामे करतील, असा विश्वास माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला.

नंदुरबार व धडगाव पंचायत समितीवर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या झेंडा फडकला, ही अभिमानाची बाब आहे. निवडणुकीत सत्तेत भागीदार असलेल्या पक्षाशीच दुर्दैवाने संघर्ष करावा लागला. विरोधकांनी संपत्तीचा जोरावर नंदुरबार पंचायत समितीच्या ताबा मिळवण्याच्या प्रयत्न केला. मात्र, शिंदे गटाच्या निष्ठावान सदस्यांनी त्यास थारा दिला नाही.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

शिवसेनेचे नंदुरबार-धडगावचे नवनिर्वाचित सभापती-उपसभापती रात्री मुंबईकडे रवाना झाले आहेत. शुक्रवारी (ता. १४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेणार आहेत.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT