Suhas Kande & Dada Bhuse
Suhas Kande & Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse News; दादा भुसे यांनी आमदार सुहास कांदेंना दाखवला ‘कात्रजचा घाट’

Sampat Devgire

नाशिक : शिंदे गटातील (Eknath Shinde) पालकमंत्री दादा भुसे, (Dada Bhuse) खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) व आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरू असतानाच, आता निधी जिल्हा समितीच्या (Nashik) (DPDC Funds) वाटपावरून पालकमंत्री भुसे व आमदार कांदे पुन्हा एकमेकांसमोर ठाकले जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेला २०२२-२३ या वर्षी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेल्या नियतव्ययातील निधी नियोजनात आमदार कांदे यांना ‘कात्रजचा घाट’ दाखविण्यात आला आहे. (Guardian minister didn`t allocate funds for MLA Suhas kande`s Constituency)

गेले काही दिवस पालकमंत्री दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे यांच्यातील दुरावा वाढत असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. त्यामुळे त्यांच्यातील संबंध ताणले गेल्याचे बोलले जाते. बांधकाम विभाग क्रमांक तीनच्या कार्यकारी अभियंत्यांनी रस्ते विकासाचे नियोजन करताना नांदगाव तालुक्याला ३०५४ या लेखाशीर्षातून शून्य रुपये व ५०५४ या लेखाशीर्षातून मंजूर असलेला संपूर्ण निधी न देता केवळ ८७ टक्के निधी दिला आहे.

आमदार कांदे यांनी यापूर्वीच जिल्हा परिषदेला समान पद्धतीने निधी वितरित करण्यात यावे, असे पत्र दिलेले असताना प्रत्यक्षात मात्र त्यांच्याच मतदारसंघात कमी निधी मंजूर केला आहे. यापूर्वी तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निधी दिला नाही म्हणून रान उठविणारे आमदार कांदे आपल्या पक्षाच्या पालकमंत्रीविरोधात काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

यंदा जिल्हा परिषदेत प्रशासक कारकीर्द असल्यामुळे शासन निर्णयांचे पालन होऊन निधीवाटप होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीचे पालकमंत्र्यांच्या संमतीने नियोजन करण्याच्या नियोजन विभागाच्या सूचना आहेत. पालकमंत्र्यांनी या आठवड्यातच जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेल्या निधीतून जवळपास सर्वच कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येतील, असे स्पष्ट केले. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये कामांना प्रशासकीय मान्यता देण्याताठी धावपळ सुरू आहे. त्यानुसार बांधकामच्या एक, दोन व तीन या तीनही विभागांनी प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत.

धोरण पालकमंत्र्यांचेच...

नियोजनापूर्वीच आमदार कांदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन सर्व तालुक्यांना समान पद्धतीने निधीवाटप करावे, असे पत्र देत सूचना दिल्या आहेत. असे असतानाही बांधकाम विभाग तीनच्या कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांनी त्यांच्याकडील निधी नियोजनात आमदार कांदे यांच्या नांदगाव तालुक्याला ३०५४ या लेखशीर्षातून एक रुपयाही दिलेला नाही. ५०५४ या लेखशीर्षातूनही देय असलेल्या निधीच्या केवळ ८७ टक्के निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्या बैठकीत गतवर्षी अधिक निधी दिलेल्या तालुक्यांना यंदा कमी निधी दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. आता त्यांच्या या धोरणाचा फटका त्यांच्याच पक्षाच्या आमदाराला बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT