Nandgaon Shivsena News : पाणी आणि विकासासाठी ठाकरे गट सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत गेल्याचा दावा आमदार सुहास कांदे करीत असतात. मात्र सध्या पाऊस रूसल्याने विरोधकांना त्यांच्या विरोधात राजकीय मुद्दा मिळाला आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर शिवसेना (ठाकरे गट) मतदारसंघात आक्रमक झाला आहे. (Shivsena Uddhav Thackeray in a aggressive mode on drought issue)
आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांच्या मतदारसंघात तीव्र दुष्काळ आहे. राज्य शासनाने (Maharashtra Government) अद्याप शेतकऱ्यांना काहीही मदत केलेली नाही, त्यामुळे नागरिकांत नाराजी आहे. यावर शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) कांदे यांची चांगलीच कोंडी केली आहे.
नांदगाव मतदारसंघाचे राजकारण सातत्याने दुष्काळ आणि पाणी या दोन विषयांभोवती फिरत असते. शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण या धोरणानुसार टँकरने पाणी पुरवठा करून सुहास कांदे आमदार झाले. पिण्याच्या पाण्याच्या योजनेला निधी मिळावा म्हणून कांदे यांनी उद्धव ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाल्याचा दावा केला होता. मात्र यंदा मतदारसंघात दुष्काळाचे तीव्र सावट आहे. शासनाने शेतकरी, नागरिकांना काहीच साह्य केले नसल्याने आमदार कांदे यांच्याविरोधात शिवसेनेने राजकारण तापवले आहे.
याबाबत शिवसेना (उद्धव ठाकरे) आक्रमक अत्यंत आक्रमक झाली आहे. त्यांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. तालुक्यात दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी, कामगार व इतर घटकांसह सर्वसामान्य नागरिकांना दुष्काळाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे कांदा अनुदान तत्काळ वर्ग करावे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराव्यात अशी मागणी करण्यात आली.
शिवेसनेतर्फे (ठाकरे गट) माजी आमदार ॲड. जगन्नाथ धात्रक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मागण्यांचा तातडीने विचार न झाल्यास शिवसेना (ठाकरे गट) रस्त्यावर उतरून आंदोलन करील, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी सहसंपर्क प्रमुख प्रवीण नाईक, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, शिवसेना जिल्हा समन्वयक सुनील पाटील, संतोष बळीद, संतोष गुप्ता, संजय कटारिया, संतोष जगताप, आशिष घुगे, कैलास बाबर, शशिकांत मोरे, ॲड. सुधाकर मोरे, लीलाताई राऊत, सनी पसाते, इरफान शेख आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.