Eknath Shinde sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena Politics : '...तर शिवसेनेची सत्तेत येणारच नाही', एकनाथ शिंदेंच्या आमदाराने मंत्र्यासमोर स्पष्टच सांगितले!

Eknath Shinde MLA Chandrakant Raghuvanshi : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या मनातील खदखद आणि निधी अभावी होणारी परवड मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत व्यक्त केली.

Sampat Devgire

Eknath Shinde News: शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष प्रत्येक निवडणुकीत इन्कमिंग करण्याच्या प्रयत्नात असतो. प्रत्येकाला निधीचे अश्वासने दिली जातात. मात्र पक्ष विस्ताराच्या वेगळ्याच अडचणी पुढे आल्या आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीसाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून बैठका घेतल्या जात आहे. नंदुरबार येथे पक्षाच्या मंत्र्याच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या अडचणी सांगताना ज्येष्ठ आमदाराचा कंठ दाटून आला.

मंत्री मंत्री उदय सामंत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यासपीठावरच थेट सुनावले. ते म्हणाले, मंत्र्यांनी कार्यकर्त्याच्या घरी जेवायला यावे अशी अपेक्षा नसते. मात्र जनतेची कामे करता यावीत अशी परिस्थिती हवी.

जिल्ह्यात पक्षाचे कार्यकर्ते आणि आमदारांना अनेक अडचणी आहेत. बहुतांशी पदांवर भाजप आहे. भाजपकडून आक्रमकपणे काम केले जाते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मात्र अडचणी येतात.

सध्याचे सरकारचे धोरण पाहता विधानसभा आमदारांना 20 टक्के निधी दिला जातो. 30 टक्के निधी पालकमंत्र्यांच्या कक्षेत असतो. दहा टक्के निधी उर्वरित सर्वांना उपलब्ध होतो. अशा स्थितीत शिवसेना शिंदे पक्षाच्या 17 जिल्हा परिषद गटांमध्ये निधीच मिळणार नसेल तर सत्ता येईल कशी? असा सवाल त्यांनी केला.

जिल्ह्यात शिवसेनाचे दोन आमदार आहे. त्यांच्या मतदारसंघात जिल्हा परिषदेचे 17 गट आहेत. भाजपचे तीन आमदार असून 39 गट त्यांच्या मतदारसंघात येतात. अशा स्थितीत कार्यकर्त्यांना जनतेची कामे करता येत नाहीत. मग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत शिवसेनेची पक्षाची सत्ता येणार तरी कशी? अडचणी आणि संकट स्पष्ट आहे, पक्ष आणि मंत्र्यांनी ते समजून घेतले पाहिजे.

पक्षाला निधी मिळाला पाहिजे

आमदार किंवा नेत्यांना निधी नको आहे, पक्षाला निधी मिळाला पाहिजे. तरच जनतेची कामे होतील. पक्षाची जनमानसात प्रतिमा सुधारेल. सत्ता येण्यास मदत होईल, असे आमदार रघुवंशी म्हणाले.

कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यासपीठावरच हे सांगताना आमदार रघुवंशी यांचा कंठ दाटून आला. काही क्षण थांबून आणि पाणी पिल्यानंतर त्यांनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली. यावेळी मंत्र्यांना पक्षाच्या अडचणी सांगताना त्यांनी स्पष्ट शब्दात सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT