Eknath Shinde party MLA controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Sena Challenges BJP : माझ्या रक्तात आजही काँग्रेस आहे..; शिंदे शिवसेनेच्या आमदाराच्या विधानाने महायुतीत नवा वाद

Chandrakant Raghuwanshi remarks create Mahayuti tension: एकनाथ शिंदे यांनी राज्यात शिवसेना ठाकरे पक्षाविरोधात राबवलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’नंतर शिंदे शिवसेनेतील नेत्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढल्याचे चित्र दिसू लागले आहे.

Pradeep Pendhare

Dhule Political News : एकनाथ शिंदे यांनी राज्यात शिवसेना ठाकरे पक्षाविरोधात राबवलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’नंतर शिंदे शिवसेनेतील नेत्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढल्याचे चित्र दिसू लागले आहे.

इतकेच नाही तर आता महायुतीतील बलाढ्य मित्रपक्ष भाजपलाही एकनाथ शिंदे शिवसेनेकडून उघड आव्हान दिले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचीच प्रचिती धुळे जिल्ह्यातील एका मेळाव्यात आली.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे धुळे येथील आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपवर थेट निशाणा साधत जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्या भाषणातील अनेक विधानांनी महायुतीच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.

भाजपला (BJP) लक्ष्य करताना रघुवंशी म्हणाले, अभिमान आणि अहंकार जास्त काळ टिकत नाही. संपूर्ण देशात भाजपची लाट असतानाही धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार पराभूत झाला होता. लोकांनी उठाव केला तर काहीही घडू शकतं. जो लोकांमध्ये राहील, तोच टिकेल. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा रंगली.

यावेळी त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीचाही उल्लेख केला. शिवसेना ही अतिक्रमण करणारी पार्टी आहे. शिवसैनिक कधी पॉश ऑफिसमध्ये बसत नाहीत. मुंबईत बघितलं तर बहुतेक शाखा रस्त्यावरच आहेत. शिवसेना कार्यकर्ताच संघटनेचा खरा कणा आहे, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

मात्र सर्वाधिक खळबळ उडवणारे विधान त्यांनी काँग्रेसबाबत केले. माझ्या रक्तात आजही थोडीफार काँग्रेस आहे, कारण माझा जन्मच काँग्रेसमध्ये झाला, असे सांगत रघुवंशी यांनी राजकीय चर्चेला नवे इंधन दिले.

भाजपसोबतच्या संबंधांवर बोलताना त्यांनी महायुतीतील समीकरणांवरही भाष्य केले. भाजप हा आमचा मोठा भाऊ आहे, हे आम्हाला मान्य आहे. पण जर मोठ्या भावाला जास्तच मस्ती आली, तर छोटा भाऊ देखील बंड केल्याशिवाय राहणार नाही, असा सूचक पण स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, या मेळाव्याच्या माध्यमातून धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शिंदे गटाने रणशिंग फुंकल्याचे मानले जात असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीतील अंतर्गत तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT