EKNATH SHINDE Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Nandgaon Election : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने खातं उघडलं, निवडणुकीपूर्वीच पहिला मुस्लिम नगरसेवक विजयी

Khan Jubedabi Gaffar : निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने राज्यात पहिले खाते उघडले असून शिवसेनेच्या (शिंदे गटाच्या) उमेदवार खान जुबेदाबी बिनविरोध निवडून आल्या आहेत. नांदगावात शिवसैनिकांनी जल्लोष केला.

Ganesh Sonawane

Nashik Nandgaon : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव नगरपालिका निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. नांदगावमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला निवडणुकीपूर्वीच मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या महिला उमेदवार खान जुबेदाबी यांची बिनविरोध नगरसेवकपदावर निवड झाली आहे.

नांदगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक आठ 'ब'मधून शिवसेना (शिंदे गटाच्या) खान जुबेदाबी गफार यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीने राज्यात निवडणुकीपूर्वीच विजयाचं पहिलं खातं हे शिवसेनेने उघडलं असून शिवसेनेचा (शिंदे गट ) पहिला उमेदवार बिनविरोध ठरला असून विजयी झाला आहे.

दरम्यान, नांदगाव नगरपरिषदेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेना (शिंदे गटाकडून) माजी नगराध्यक्ष राजेश कवडे आणि सागर हिरे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे यात कुणाचा गेम होणार याबाबत उत्सुकता होती. त्यानुसार छाननी प्रक्रियेमध्ये राजेश कवडे यांचा गेम झाला. नांदगावातून आमदार सुहास कांदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या सागर हिरे यांना शिवसेना शिंदे गट व भाजप युतीच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी निश्चित झाली.

छाननी प्रक्रियेत शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केलेले राजेश कवडे यांना मोठा धक्का बसला असून त्यांचा अर्ज निवडणूक आयोगाकडून अवैध ठरवण्यात आला. तर सागर हिरे यांचा अर्ज निवडणूक आयोगाने वैध ठरवला. सागर हिरे यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर सुहास कांदे समर्थक कार्यकर्त्यांनी यावेळी एकच जल्लोष केला. नगरपरिषद कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले.

नांदगावमध्ये समीर भुजबळ यांनी भाजपसोबत युती करण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यांना त्यात काही यश आलं नाही. सुहास कांदे यांनी समीर भुजबळांच्या मनसुब्यांवर पाणी ओतत भाजप सोबत युती घडवून आणली आहे. त्यामुळे समीर भुजबळ यांची व त्यांच्या गटाची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला आहे.

नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (शिंदे गट) व भाजपची युती झालेली असल्याने महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) ने पत्ता ओपन करीत मूळ भाजपचे असलेले माजी नगराध्यक्ष राजेश भीमराव बनकर यांना कळपात खेचत त्यांना थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या राजेश बनकर यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देत माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT