Eknath Shinde & Masood Jilani Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Politics: विधानसभा निवडणुकीत सापडलेल्या १.९८ कोटींचे प्रकरण तापणार...उद्धव ठाकरेचे नेते वरीष्ठांकडे मागणार दाद?

Eknath Shinde; Shivsena Eknath shinde party leader Jayant Sathe caught with 1.98 Cr. in a Five star hotel in Nashik-शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते जयंत साठे यांच्या पंचतारांकीत हॉटेलातील खोलीतील १.९८ कोटी रुपये निवडणूक निरीक्षकांनी केले होते जप्त

Sampat Devgire

Eknath shinde News: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या विविध नेत्यांवर रोकड सापडल्याचे आरोप होत आहे. या बातम्यांनी सत्ताधारी पक्षांना बचावात्मक स्थितीत वावरावे लागत आहेत. या अडचणी थांबण्याची चिन्हे नाहीत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांवर लक्ष्मी जरा जास्तच प्रसन्न असल्याचे वर्तमानपत्रातील बातम्यांवरून दिसते. त्यामुळे एकंदरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कोट्यावधी रुपयांची रोकड यांचे संबंध काही वेगळेच आणि घनिष्ठ दिसतात. सध्या राजकीय नेत्यांत हा चर्चेचा विषय बनला आहे.

धुळ्यात आमदार अर्जुन खोतकर यांच्या पीए च्या खोलीत १.८४ कोटी रुपये सापडले. त्याबाबात कारवाईसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पिच्छा पुरवला. अखेर त्याबाबत खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश धुळे जिल्हा न्यायालयाने दिल्याने तपास यंत्रणांनी कोंडी झाली. असाच प्रकार देवळाली मतदारसंघात सापडलेल्या रोकड संदर्भात सुरू झाला आहे.

धुळे शहरातील या प्रकरणामुळे विधानसभा निवडणुकीत देवळाली विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवाराशी संबंधीत प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे नाशिकचे संपर्क प्रमुख व ठाणे येथील रहिवासी जयंत साठे यांच्याकडे हॉटेल रेडिसन ब्लू येथील खोलीत १.९८ कोटी रुपये सापडले होते. त्याचा पंचनामा झाला. मात्र अद्याप काहीच कारवाई किंवा गुन्हा दाकल झालेला नाही.

या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मसुद जिलानी यांनी निवडणुक आयोगाचे निरीक्षक स्वामी यांच्या मार्फक छापा टाकून शिंदे पक्षाचे जयंत साठे यांच्याकडे १.९८ कोटी रुपये पकडून दिले होते. यावेळी महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात संबंधीत उमेदवाराच्या मंत्रालयात कार्यरत महिला अधिकारीही व्हीडीओ फुटेजमध्ये आढळल्या होत्या.

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वेळा सुनावणी झाली. संबंधित पैसे ट्रेझरीमध्ये जमा करण्यात आले आहेत. त्याची सुनावणी विधानसभा निवडणूक निकालापासून सुरूच आहे. संबंधीत श्री साठे हे केवळ एकदाच या सुनावणीला उपस्थित होते. त्यामुळे यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येण्याची चिन्हे आहेत.

याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते मसुद जिलानी यांनी याबाबत सांगितले की, जिल्हाधिकारी यांची गुन्हा दाखल करणे ही जबाबदारी आहे. मात्र ते टाळाटाळ करतात. त्यामुळे याबाबत लवकरच विभागीय महसूल आयुक्तांकडे दाद मागणार आहे. त्यानंतरही कारवाई न झाल्यास न्यायालयात याचिका करण्यात येईल.

----------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT