Shivsena UBT Corporators with Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde : शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला दिल्लीतून धक्का, दोन नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश!

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या दोन माजी नगरसेवकांसह तिघांचा दिल्लीत घडला शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश.

Sampat Devgire

Nashik News: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांची आयात सुरूच आहे. नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा काही प्रवेश झाले. विशेष म्हणजे हे प्रवेश चक्क दिल्लीत झाल्याने तो चर्चेचा विषय आहे.

नाही नाही म्हणता काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका डॉ हेमलता पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. यापूर्वी त्यांनी आपण काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर ठाणे येथे त्या प्रवेशासाठी गेल्या होत्या. मात्र ऐनवेळी प्रवेश न करताच त्या निघून गेल्या होत्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होता. त्यानिमित्त ते काही वेळ दिल्लीत होते. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रवेश घडवून आणला. काँग्रेसच्या डॉ पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या रंजना बोराडे आणि दीपक दातीर या तिघांचा प्रवेश काल झाला.

या निमित्ताने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला स्पष्ट संदेश दिला आहे. दीपक दातीर आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यातील राजकीय वितृष्ठामुळे दातीर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. श्री दातीर हे स्थानिक कार्यकर्ते असल्याने शिवसेना ठाकरे पक्षाला सातपूर अंबड भागात धक्का मानला जातो.

माजी नगरसेविका बोराडे यांनी देखील जेलरोड परिसरातील गेली २५ वर्ष नगरसेवक असलेल्या नेत्या आहेत. त्यांच्या प्रवेशाने नाशिक रोड भागातील शिवसेनेला झटका बसणार आहे. या निमित्ताने शुक्रवारी होणाऱ्या आभार दौऱ्याआधीच मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना शिंदे पक्षाचे माजी खासदार हेमंत गोडसे आणि संपर्क नेते अजय बोरस्ते यांच्या माध्यमातून हा प्रवेश झाला.

या तिन्ही नगरसेवकांचा योग्य सन्मान करून त्यांच्यावर पक्ष जबाबदारी देईल, असे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे या नगरसेवकांना संघटनात्मक पदे देखील दिली जाण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे पक्ष सक्रीय आहे.

सध्या शिवसेना शिंदे पक्षाचे मुंबईतील काही नेते नाशिकमध्ये ठाण मांडून आहेत. ते विविध पक्षाच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची संपर्क करीत आहेत. आभार दौऱ्यामध्ये मोठा प्रवेश घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आभार दौऱ्याच्या सभेत आणखी किती मोहरे त्यांच्या गळ्याला लागतात याची आता उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT