BJP Vs Eknath Shinde: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला सर्वच नेत्यांनी सुरुवात केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते आहे.
शनिवारी नंदुरबार शहरात भाजपचे डॉ विजयकुमार गावित यांनी पक्षाची बैठक घेतली. त्याचवेळी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. दोघांनीही आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे असे आवाहन केले.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते आमदार रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांनी कोणत्याही पक्ष परिस्थितीत आपला उमेदवार निवडून आणला पाहिजे. भविष्यात आपली युती कोणाशी होईल, हे सांगता येत नाही. मात्र युतीची वाट न पाहता निवडणुकीच्या तयारीला लागले पाहिजे. कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवार कोण एव्हढे एकमेव उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवावे.
आमदार रघुवंशी यांनी गेल्या पाच वर्षात लोकांच्या संपर्कात राहून, त्यांचे प्रश्न सोडविले आहेत. लोकांच्या अडचणीत धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून आपण काम करीत आलो आहोत. निवडणुकीत आपल्याला त्याच दृष्टीने जनतेची कामे करता यावीत म्हणून जिंकावे लागेल, असे सांगितले.
यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी, माजी सभापती विक्रमसिंग वळवी, देवमन पवार, डॉ सयाजीराव मोरे या नेत्यांनीही कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आवाहन केले. शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष महायुतीचा घटक म्हणून सत्तेत सहभागी आहे. पक्षाची सत्ता आणि शक्ती अधिक मजबूत करण्यासाठी आगामी निवडणुका जिंकल्याच पाहिजे. दुसरा कोणताही पर्याय आपल्यापुढे नाही असे सांगितले.
यानिमित्ताने महायुतीच्या घटक पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यामध्ये पक्ष ऐवजी या नेत्यांची व्यक्तिगत प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. महायुतीत एकत्र असले तरीही स्थानिक राजकारणात मात्र ते परस्परांचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे युती कोणाशी होणार याविषयी अनिश्चितता दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
--------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.