Local-Body-Elections Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena Vs BJP Politics: एकनाथ शिंदे पक्षाने केली भाजपची गोची; यादीत शोधली २.९८ लाख संशयास्पद मतदार!

Eknath Shinde's party created a dilemma for BJP, indirectly supported the allegation of vote theft, Shiv Sena tickled Thackeray's party-शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या मतदारयादी विरोधातील सत्याचा मोर्चाचा उपहास करणाऱ्या भाजपला मिळाला घरचा आहेर.

Sampat Devgire

Shivsena Eknath Shinde News: देशभर वोट चोरीचा मुद्दा गाजत आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी मुंबईत मोठे शक्ती प्रदर्शन केले. भाजपकडून प्रत्युत्तरादाखल मुक मोर्चा काढण्यात आला होता.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारयादी आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतला आहे. देशाच्या विविध भागात यावर राजकारण तापले. भाजपने त्याचा प्रतिवाद करीत निवडणूक आयोगाची पाठराखन केली होती.

नाशिकमध्ये मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या कायदा आघाडीचे हर्षल केंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावर गंभीर शोध घेतला. त्यानंतर या नेत्यांनी मतदार यादीवर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. दुबार आणि बोगस मतदारांची नावे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे मतदारयादी संशयास्पद असल्याची त्यांची तक्रार आहे.

यासंदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या कायदा सेलने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. ग्रामीण भागातील नावे विशिष्ट मतदारसंघात नोंदविणे. मृत आणि स्थलांतरित मतदारांची नावे दोन ठिकाणी समाविष्ट करणे. असे विविध आक्षेप निवेदनात आहेत.

या मतदारयाद्या तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. शहरातील चार विधानसभा मतदारसंघात दोन लाख ९८ हजार संशयास्पद आणि दुबार नावे असल्याची सप्रमाण तक्रार त्यांनी केली आहे. यामध्ये देवळाली मतदारसंघात ८६ हजार तर नाशिक पश्चिम मतदार संघात ९३ हजार ५१७ संशयास्पद नावे असल्याची तक्रार आहे.

शहरातील मतदार संघाच्या यादीत समाविष्ट बोगस आणि संशयास्पद नावे तातडीने वगळावेत या संदर्भात मतदार याद्यांचे पुनरावलोकन करावे. संबंधित त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पुढाकार्याने मुंबईत सत्याचा मोर्चा काढण्यात आला. वेळी निवडणूक आयोगाच्या कामकाज पद्धतीचे वाभाडे काढण्यात आले. मतदार यादीतील अनेक घोटाळे पुराव्यासह उघड केले. त्यामुळे हा मोर्चा राजकीय दृष्ट्या चर्चेचा विषय ठरला.

ठाकरे बंधूंच्या या मोर्चाने भाजप अस्वस्थ झाल्याचे स्पष्ट दिसले. या मोर्चाला उत्तर म्हणून मुंबईत मूक मोर्चा काढण्यात आला. त्यात संबंधित आरोप फेटाळण्यात आले होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या कायदा सेलने नाशिकला केलेल्या तक्रारीने भाजप तोंडावर पडला आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT