Raut and Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe : ...तेव्हा मग 'स्कॅम मास्टर' सचिन वाझे 'मातोश्री' अन् 'वर्षा'वर काय करत होता? विखेंचा राऊतांना सवाल!

Elvish Yadav Case : एल्विश यादव प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंवर केलेल्या टीकेला दिलं आहे प्रत्युत्तर, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?

Pradeep Pendhare

Radhakrishna Vikhe Vs Sanjay Raut : सापाच्या विष आणि ड्रग्ज तस्करीत यूट्यूबर एल्विश यादव याला अटक झाली आहे. याशिवाय एल्विश यादव हा गणेशोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारी निवासस्थानी होता. यावर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर केली टीका केली आहे. यावरून राज्याचे राजकारण तापले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पार्श्वभूमीवर आता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे मुख्यमंत्र्यांच्या बाजूने धावून आले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात स्कॅम मास्टर सचिन वाझे मातोश्री आणि वर्षावर काय करत होता? असा सवाल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना केला आहे.

महसूलमंत्री विखे म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतचे संजय राऊत यांचे विधान आश्चर्यकारक आहे. कोणत्याही गोष्टीचे भांडवल केले जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात अनेक स्कॅम झाले. स्कॅम मास्टर सचिन वाझे मातोश्री आणि वर्षावर काय करत होता?''

याचबरोबर ''मंत्र्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती नसते. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेलेल्या व्यक्तीबाबत एवढे भांडवल करण्याची आवश्यकता नाही. याबाबत कोणतेही तथ्य नाही. जर काही असेल, तर त्याची कारवाई होईल. स्कॅम मास्टर सचिन वाझे महाविकास आघाडी सरकारच्या काळात कुठे, कुठे फिरत होता? खंडणी गोळा करायचे टार्गेट कोणी दिले होते? याबाबत संजय राऊत गप्प का राहतात हे कळत नाही,'' असेही मंत्री विखे म्हणाले.

महाविकास आघाडीच्या हलगर्जीपणामुळे आरक्षण गेले-

'मराठा आरक्षण देण्याबाबत सरकार आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून सकारात्मक आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच सर्वांची भावना आहे. शासनस्तरावर यासाठी वेगाने कारवाई सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात मराठा समाजाला मिळालेले आरक्षण महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हलगर्जीपणामुळे गेले', असा टोला मंत्री विखे यांनी लगावला.

संजय राऊत यांचा काय होता आरोप? -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करताना यूट्यूबर एल्विश यादव याच्या अटकेचा दाखला देत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात गंभीर विधान केले होते. 'महाराष्ट्रात माफियागिरी वाढली आहे. मंत्रालयातील सहावा मजला त्याचे केंद्र आहे. आता त्याचे लोन वर्षा या सरकार बंगल्यापर्यंत पोहोचले आहे,' असे खासदार राऊत यांनी आरोप केले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT