<div class="paragraphs"><p>Jaykumar Rawal at Dondaicha APMC</p></div>

Jaykumar Rawal at Dondaicha APMC

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

पगारही होत नव्हते, ती बाजार समिती नफ्यात आणली!

Sampat Devgire

धुळे : अनेक वर्षांपासून दोंडाईचा बाजार समिती तोट्यात होती. अनेक महिने कर्मचाऱ्यांचे पगारही होत नव्हते. सध्याच्या संचालक मंडळाने या बाजार समितीला नफ्यात आणली आहे, असे गौरवोद्‌गार आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी काढले.

ते म्हणाले, या बाजार समितीत आता सध्याच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात सुमारे सहा कोटींची विकासकामे स्वनिधीतून झाली आहेत. कर्मचाऱ्यांचे पगारही आता नियमित होत आहेत. स्वमालकीचा पेट्रोलपंप असलेली महाराष्ट्रातील पहिली बाजार समिती असावी, याचा आनंद वाटतो.

दोंडाईचा बाजार समितीत ५८ लाखांच्या नवीन शेड लोकार्पण व मुख्य यार्डमध्ये ६५ लाखांतर्गत रस्ते दुरुस्ती, डांबरीकरणाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक सरकारसाहेब रावल, धुळे-नंदुरबार जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, बाजार समितीचे सभापती तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते कामराज निकम, हस्ती बॅंकेचे अध्यक्ष कैलास जैन यावेळी उपस्थित होते.

सरकारसाहेब रावल, श्री. कदमबांडे, श्री. देसले, विक्रम पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कदमबांडे, नवनिर्वाचित संचालक देसले यांचा बाजार समितीतर्फे सत्कार झाला. बाजार समितीचे सभापती पाटील यांनी प्रास्ताविक केले. डी. एस. गिरासे यांनी सूत्रसंचालन केले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT