Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: पंडीत नेहरूंचे चित्र छापायचे नाही, हा निर्णय अयोग्यच!

Sampat Devgire

नाशिक : देशाच्या स्वातंत्र्यवीरांचा (Freedom Movement) इतिहास शिकवला गेला पाहिजे. काही पुस्तकांतून त्याची माहिती होती. मात्र ते धडे गाळायचे काम आता सुरु झाले आहे. शेजारच्या राज्यात पंडीत नेहरूंचे (Pandit Nehru) चित्र छापायचे नाही, असा काही तरी फतवा निघाला आहे. हे काय चालले आहे. त्यांचे बलिदान कोण विसरू शकतं का? असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला. (How can we forget Pandit Jawaharlal fight for nation`s freedom his struggle & sacrifice)

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन सर्वांनी आनंदाने साजरा केला पाहिजे. सर्व लोक तो साजरा करता आहेत. हाच तिरंगा हातात घेऊन हजारो, लाखो देशाच्या सीमेवर जवान लढत आहेत. तिरंगा हातातून सुटणार नाही, याची काळजी घेतात. त्यामुळे आपण ज्या ज्या घरावर तिरंगा लावला आहे. ज्यांनी लावला नसेल, त्यांनी देखील लावला पाहिजे.

यामध्ये दोन विषय आहेत. आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन आहे. याचा अर्थ ७५ वर्षांपूर्वी आपण स्वतंत्र नव्हतो, पारतंत्र्यांत होतो. ते स्वातंत्र्य आपल्याला आपोआप आले का?, नाही. लोकमान्य टिळक, राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, लाला लजपत राय, वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, अनेकांनी बलिदान दिले. त्यांची नावे देखील आपल्याला माहित नाहीत. पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू देशातील सर्वात श्रीमंत वकिलांपैकी एक होते. पंडीत नेहरू त्यांचे चिरंजीव होते. त्यांनी सगळं सोडलं आणि ११ वर्षे कारागृहात राहिले. सगळी संपत्ती देशाला अर्पण केली. ही मंडळी जेव्हा लढत होती, तेव्हा त्यांना काय माहिती होतं की, आपल्याला स्वातंत्र्य मिळेलच. मिळण्यासाठी लढायचं पण मिळेलच याची गॅरन्टी नव्हती. प्राणाची पर्वा न करता प्रत्येक जण स्वातंत्र्यासाठी लढत होते. हा इतिहास १८५७ पासून सुरु आहे. तो नव्या पुढीपुढे आला पाहिजे.

देशाच्या या सर्व स्वातंत्र्यवीरांचा इतिहास शिकवला गेला पाहिजे. काही पुस्तकांतून त्याची माहिती होती. ते धडे गाळायचे काम आता सुरु झाले आहे. शेजारच्या राज्यात पंडीत नेहरूंचे चित्र छापायचे नाही, असा काही तरी फतवा निघाला आहे. हे काय चालले आहे. त्यांचे बलिदान कोण विसरू शकतं. त्यांना माहिती होते का की, ते पंतप्रधान होणार म्हणून. पंतप्रधान इंदिरा गांधी, लाल बहादूर शाश्त्री पाकीस्तान विरोधात युद्ध केले. पाकीस्तानचे दोन तुकडे केले. चीनचे आक्रमण झाले. यशवंतराव चव्हाण केंद्रात गेले. आज जी इलेक्ट्रॅानिक क्रांती झाली, त्याचा पाया राजीव गांधी यांनी घातला. देशाची उन्नती झाली, ती एका विशिष्ट पायावर उभी आहे. नेहरू, डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांसारखे त्यात होते. राजीव गांधी यांनी परदेशातून सॅम पित्रोदा यांना बोलावलं. त्याला विरोध झाला, पण आज संगणकाशिवाय चालतच नाही.

आज कोणीही काहीही बोलतंय. एक भनीनी म्हणाले, स्वातंत्र्य आम्हाला भीक म्हणून मिळालं. एक म्हणाली, देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं. तसे असेल तर ७५ वा स्वातंत्र्यदिन कसला साजरा करत आहात?. काय बोलावं याला काही मर्यादा आहेत की नाही. काय बोलणार यांना. जसं अलिकडच्या लोकांचे कर्तृत्व आपण दाखवतो, तसंच त्यापूर्वीच्या लोकांचे कर्तृत्व देखील दाखवल पाहिजे. १९४२ मध्ये ऑगष्ट क्रांती मैदानात ४० करोड भारतीय नही डरेंगे, करेंगे या मरेंगे ही घोषणा मुंबईत झाली. तेव्हा आधीच सगळ्यांना अटक झाली. अरूणा असफअली या एकट्या आल्या आणि त्यांनी तिरंगा फडकवला. मुस्लीमांचा देखील तेव्हढाच सहभाग आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT