Sharad aher & Dr hemlata patilof Congress  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

काँग्रेसची सत्ता आल्यास शहरातील प्रकल्पांची दुरावस्था दूर करणार

काँग्रेस शिष्टमंडळाने शहरातील सर्व महत्त्वाचे प्रकल्प काँग्रेसच्या कार्यकाळातच पूर्ण झाले, असा दावा केला.

Sampat Devgire

नाशिक : काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षांच्या सत्ता काळात महापालिकेत खर्चाच्या कामांवर अधिक भर देण्यात आला. (Congres have concentrate devolopment af all sector & Class) शहरात आजपर्यंत उभे राहिलेल्या प्रकल्प काँग्रेस सत्तेच्या काळातच पूर्ण झाले आहे. (All major projects cpmplete in congress tenure) त्यामुळे पुन्हा सत्ता आल्यास कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दुरवस्थेतील प्रकल्पांना ऊर्जितावस्थेत आणण्याबरोबरच शहराची आरोग्य व्यवस्था भक्कम करणे, पाणीपुरवठा वितरण व्यवस्था अधिक सक्षम करणे, स्वच्छता व रोजगारासाठी नवीन संकल्पना अमलात आणण्याचे उद्दिष्ट असेल, असे आश्‍वासन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने (Congress delegation) दिले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी ऑगस्ट महिन्यात सहा विभागांमध्ये विशेष मोहीम राबविली. मोहिमेअंतर्गत महिला व युवकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा नाशिककरांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आल्या. नाशिककरांच्या जाहीरनाम्याचा अहवाल काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाकडे सुपूर्द करण्यात आला. सकाळ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी भूमिका स्पष्ट केली. शहराध्यक्ष शरद आहेर, काँग्रेस गटनेते शाहू खैरे, प्रदेश प्रवक्त्या व नगरसेवक डॉ. हेमलता पाटील, राहुल दिवे, मध्य विधानसभा अध्यक्ष नीलेश खैरे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष वत्सला खैरे, आशा तडवी, नरेश पाटील, उद्धव आहेर, रफीक तडवी आदी उपस्थित होते. शहराध्यक्ष आहेर म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय व आरोग्य सेवा भक्कम करणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीने विभागनिहाय महिला रुग्णालय असावे, स्वच्छता, पाणीपुरवठा वितरण व्यवस्था सक्षम करणे महत्त्वाचे ठरेल. महापालिकेच्या व्यावसायिक गाळ्यांचे दर कमी व्हावे ही पक्षाची भूमिका आहे.

शहरात मल्टीस्टोरेज पार्किंग व्हावे. मोकळ्या भूखंडावर उद्याने नको, प्रभागनिहाय एक उद्यान असावे, महिलांसाठी स्वच्छता गृहे उभारली जावी. नगरसेवकांमार्फत बेंचेस बसविले जातात, परंतु त्यावर निर्बंध आले पाहिजे.

- डॉ. हेमलता पाटील, नगरसेविका,

...

स्मार्टसिटी कंपनी बरखास्त झाली पाहिजे. गावठाणात घरपट्टी नको, वाड्यांना हेरिटेज दर्जा द्यावा, धोकादायक पुलांचे ऑडिट व्हावे, क्रीडांगणे विकसित करणे महत्त्वाचे आहे.

- शाहू खैरे, गटनेते, काँग्रेस गटनेते.

महापालिकेच्या रुग्णालयातील पदे कायमस्वरूपी भरली जावी. गावठाण व झोपडपट्टी भागात दोन वेळचा पाणी पुरवठा व्हावा, उद्याने महिला बचत गटांना तीन वर्षांसाठी देखभालीसाठी द्यावी.

- राहुल दिवे, नगरसेवक.

...

शहराच्या विकासात काँग्रेसचे मोठे वाटा आहे. सन २००७ पर्यंत काँग्रेसच्या काळात विकासकामांना गती होती. शहरात फाळके स्मारक, कालिदास कलामंदिर यासारखे मोठे प्रकल्प काँग्रेसच्या काळातच झाले आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे विकासाला गती देवू.

- शरद आहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT