Eknath Shinde -Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Fadnavis on Kirtikar : शिंदे गटातील खासदारांच्या नाराजीचा विषय फडणवीसांनी दोन वाक्यात संपवला

सर्व गोष्टी ठरल्यानंतर त्या माध्यमांना सांगण्यात येतील.

सरकारनामा ब्यूरो

Nagar : भारतीय जनता पक्षाकडून आम्हाला सन्मान मिळत नाही. सापत्न वागणूक मिळते, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केला होता. तसेच, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नाराजीही व्यक्त केली होती. त्यावर भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘खासदार गजानन किर्तीकर यांनी असं कुठंही म्हटलेले नाही. या सर्व कपोलकल्पित बातम्या आहेत,’ असं त्यांनी म्हटलं आहे. (Fadnavis ended the issue of MPs from Shinde faction in two sentences)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटातील खासदारांची बैठक नुकतीच पार पडली. त्या बैठकी खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी भाजपकडून आपल्याला सन्मानाची वागणूक मिळत नाही, अशी नाराजी बोलून दाखवली होती. तसेच, आज माध्यमांशी बोलताना त्याचा किर्तीकरांनी पुनरुच्चार केला होता. मात्र, शिंदे गटातील नाराजीचा विषय देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) धुडकावून लावला.

लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात कोणताही प्रश्न नाही. आम्ही समन्वय ठेवून काम करणारे लोक आहोत. शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये समन्वय ठेवून काम पूर्ण केले जाईल. सर्व गोष्टी ठरल्यानंतर त्या माध्यमांना सांगण्यात येतील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले होते किर्तीकर?

आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्याने आम्ही १३ खासदार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहेत. पूर्वी आम्ही एनडीएचा घटक नव्हतो. पण, आता आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक झालो आहोत. आम्ही एनडीएचा घटक झाल्याने आमची कामे झाली पाहिजेत. घटक पक्षाला तेवढा दर्जा दिला पाहिजे. पण, भाजपकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही. सापत्न वागणूक आम्हाला मिळते, अशा शब्दांत गजानन किर्तीकर यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT