Chhagan Bhujbal 2 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal fake news : मंत्री भुजबळांच्या मृत्यूची खोटी पोस्ट समाज माध्यमांमध्ये व्हायरल; सायबर पोलिस गुन्हेगारांच्या मागावर

FIR in Nashik Against YouTuber for Fake News on NCP Minister Chhagan Bhujbal Death : मंत्री छगन भुजबळ यांच्या मृत्युची खोटी पोस्ट टॅगलाईन वापरून युट्युबवर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास व्हायरल केली.

Pradeep Pendhare

Nashik police FIR fake news : राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री 'छगन भुजबळ यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं दु:खद निधन' या मथळ्याखाली व्हिडिओ एका टीव्ही चॅनेलचा बनावट लोगो वापरून सोशल मीडियावर व्हायरल झाला.

याप्रकारानं राज्यात खळबळ उडाली होती. ही खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात संशयिताविरोधात शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक (Nashik) शहर आयुक्तालयाच्या विशेष शाखेचे अंमलदार सुनील बहारवाल यांनी फिर्याद दिली आहे. सोशल मीडियावर विशेष शाखेकडून ऑनलाईन सर्फिंग करून आक्षेपार्ह पोस्टवर करडी नजर ठेवली जात असते. सर्फिंग सुरू असताना, एका वृत्तवाहिनीचा लोगो वापरून ‘मंत्री छगन भुजबळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन’ अशा मथळ्याखाली व्हिडिओची लिंक निदर्शनास आली.

या लिंकची सविस्तर माहिती घेताना, सदरील लिंक ओपन करून पाहिली असता, त्यात श्रीमती रंजनीताई बोरस्ते यांचे दु:खद निधनाची व त्यांना मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यु-ट्युबवर श्रद्धांजली अर्पण केल्याची, ती बातमी होती. परंतु संशयिताने मंत्री भुजबळ यांच्या मृत्युची खोटी पोस्ट टॅगलाईन वापरून युट्युबवर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास व्हायरल केली.

ही पोस्ट सुमारे सव्वा लाख नागरिकांनी पाहिली होती. त्यामुळे समाजात अफवा पसरून जनक्षोभ उसळण्याची शक्यता होती. तसेच शहराच्या शांततेचा भंग होईल, असे कृत्य होते. याप्रकरणी हेल्पलाईन किसान या डिस्प्ले नाव असलेल्या @Nana127tv या नावाच्या युट्युब चॅनेलविरोधात शहर सायबर पोलिसात 353 (1), 345 (3), भान्यासं 66 (क), माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 103, भारतीय ट्रेडमार्क ॲकटनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर सायबरचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे, सहायक निरीक्षक सुरेश कोरबू हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

ही न्यूज व्हायरल करताना बनावट लोगोचा वापर करण्यात आला आहे. तसेच ही बातमी मोठ्या वृत्तवाहिनीने अपलोड केली, असे भासविले आहे. याप्रकरणी संबंधित वृत्तवाहिनीकडे ई-मेल करून माहिती घेतली जात आहे. तसेच संशयिताचा तांत्रिक तपासानुसार शोध सुरू आहे, असल्याची प्रतिक्रिया गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT