Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis: राज्यातील सत्तांतर नाट्य हे भाजपचेच 'ऑपरेशन'

Sampat Devgire

पाचोरा : मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) व मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राज्यातील सत्तांतर नाट्याचा पाढा वाचून उपस्थितांची चांगलीच करमणूक केली. राज्यातील सत्तांतर नाट्य हे भाजपचे (BJP) 'ऑपरेशन' होते, हे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केल्याने सारेच अवाक् झाले. (BJP plan a political power game in maharashtra is success)

बडगुजर समाज अधिवेशनाच्या समारोपानिमित्त मुख्यमंत्र्यांचा नियोजित दौरा प्रथम रद्द झाला व नंतर पुन्हा हा दौरा निश्चित झाल्याने पोलिस, महसूल प्रशासनासह शिवसेना, भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक झाली. सुमारे पाच तास उशिरा मुख्यमंत्री या समारोप कार्यक्रमात उपस्थित झाले होते. लोहारी बुद्रुक (ता. पाचोरा) येथे बडगुजर समाजाचे दोन दिवसीय महाअधिवेशन नुकतेच पार पडले. अधिवेशनाचा समारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना शिंदे मुख्यमंत्री होतील, असे वाटत नव्हते पण हे सारे घडून आले. असा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी तोच धागा पकडत सत्तांतर नाट्यासंदर्भात स्पष्टोक्ती दिली. प्रथम मुख्यमंत्री शिंदे यांना मोठ्या मनाचा माणूस, जाणता राजा, रात्री उशिरापर्यंत काम करणारा, चार तासही झोप न येणारा अशी विशेषणे लावली. ऑपरेशनला सुरुवात तर केली पण हे यशस्वी होईल, असा विश्वास वाटत नव्हता.

म्हणाले, हे सोपे काम नव्हते. उद्धव ठाकरे सरकारला कंटाळून प्रथम १८ आमदार निघाले आणि तो आकडा ४० पर्यंत गेला. पुढे एकनाथ शिंदे राजा व मागे सर्व सैन्य आल्याने शेवटी सगळे जमले व एकदाचे व्हायचे ते झाले. ही लाट एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवून गेली व राज्याला न्याय देणारे सरकार सत्तेवर आले, असे स्पष्ट केल्याने उपस्थितांनी टाळ्यांसह घोषणाबाजी केली. त्यामुळे हशाही पिकला.

शेवटी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवराय व चामुंडा मातेचा जयघोष करत मनोगत सुरू केले. आपल्या मनोगतात त्यांनी' मैने एक बार कमिटमेंट करली तो मै खुद की भी नही सुनता...’ हा सलमान खानचा डायलॉग मारत मी शब्द पाळतो म्हणून लोकांनी विश्वास ठेवला. म्हणूनच ५० लोक माझ्यासोबत आले व मी मुख्यमंत्री झालो. गिरीशभाऊ सगळे खेळ खेळणारा चांगला खेळाडू, आहे असा शब्दप्रयोग केला. परदेशात गोविंदा पाठविणारा पहिला मंत्री गिरीशभाऊ असल्याचे स्पष्ट केले. कुणाचेही नाव न घेता आम्ही ३० जूनलाच मोठ्ठी हंडी फोडली. बाळासाहेबांचे विचार व आनंद दिघे यांचा आदर्श समोर ठेवून त्यावेळी निर्णय घेतला व त्याच दृष्टिकोनातून गेल्या सहा महिन्यांपासून आमचे सरकार कामकाज करत आहे. लोकहिताचे विक्रमी निर्णय घेत आहे.

याप्रसंगी आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, खासदार ज्ञानेश्वर पाटील (खंडवा), माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, सुनीता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, पदमसिंग पाटील, भाजपचे मधुकर काटे, नंदू सोमवंशी, सुभाष पाटील आदी राजकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT