Amol Deshmukh & Gopal Deshmukh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Good News; शेतमजूर आईची दोन्ही मुले झाली ‘पीएसआय’

रोटवद (जळगाव) येथील देशमुख बंधूंची यशोगाथा; स्पर्धा परीक्षेतून स्वप्नाला गवसणी

Sampat Devgire

गणेश पाटील

जामनेर : (Jalgaon) महाराष्ट्र पोलिस दलात (Police) अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उडी घेतात. मात्र, अपयश आल्याने अनेक जण खचूनही जातात. परीक्षेत प्रत्येकाला यश मिळतेच, असे नाही. पण मेहनत केली, तर यशाचे शिखरही सहज गाठता येत असल्याचे दाखवून दिले आहे, ते रोटवद येथील देशमुख बंधूंनी. (Jamner`s Dshmukh brothers success in MPSC exam for Police officers)

खात्यांतर्गत नुकताच पोलिस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निकाल जाहीर झाला. यात जामनेर तालुक्यातील रोटवदचे पुत्र तथा नंदुरबार येथील पोलिस कर्मचारी अमोल देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षक पदासाठी खात्यांतर्गत निवड झाली.

वयाच्या आठव्या वर्षीच पितृछत्र हरवले, अशा या संकटात सापडलेल्या परिवाराला आधार देण्यासाठी गावातील माजी पोलिसपाटील (स्व.) लक्ष्मण भिका पाटील यांनी या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळली आणि यातील मोठा भाऊ गोपाल देशमुख गडचिरोली जिल्ह्यात पोलिस झाल्यानंतर अमोल देशमुखदेखील नंदुरबार जिल्हा पोलिस दलात २०१३ मध्ये नियुक्त झाला.

एका छोट्याशा गावामधील शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील दोन्ही भाऊ पोलिस दलात भरती झाल्याने कुटुंबाची स्थिती पूर्ण बदलली. कालांतराने मोठा भाऊ स्पर्धा परीक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) झाला व तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून लहान भाऊदेखील या परीक्षेच्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षक झाला. वडिलांचे निधन झाल्यानंतर शेतमजुरी करणाऱ्या आईच्या मुलांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळविले.

विशेष म्हणजे, दोन्ही भावांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालेले आहे. अमोल देशमुख कर्तव्याबरोबर सामाजिक कार्यावर भर देत असताना आणि ग्रामीण भागातील मुलेदेखील पोलिस दलात नियुक्त व्हावीत, यासाठी जामनेर तालुक्यात विविध खेडेगावांमध्ये मोफत पोलिस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर भरवितात. या शिबिराचा लाभ अनेक तरुणांनी घेतला व अजूनही घेत आहेत.

यशात कुटुंबाचा वाटा

कोणत्याही यशामागे कुणाचा तरी हात असतोच, तसेच आपल्या यशात (स्व.) लक्ष्मणदादा पाटील, आई, भाऊ, नातेवाईक, सासू सासरे, मित्रपरिवार, नंदुरबार पोलिस दल, गुरुवर्य, वसंत तडवी, सारंग गवळी, रवींद्र भोई यांचा तर वाटा आहेच; पण माझ्याकडून सर्व तयारी करून घेणाऱ्या, मला सतत अभ्यासाला, मैदानावर सरावासाठी वारंवार अट्टहास करून पाठविणाऱ्या आणि या काळात माझी योग्य ती काळजी घेणाऱ्या माझ्या पत्नीचा खूप मोठा खारीचा वाटा असल्याचे मतही अमोल देशमुख यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT