Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate News : अजित पवारांवरील नाराजीतून शेतकऱ्याने थेट कृषीमंत्री कोकाटेंनाच मागितली गांजा लागवडीसाठी परवानगी!

Farmers seek permission from Agriculture Minister Kokate for cannabis cultivation : कृषिमंत्र्यांच्या मतदासरंघातच हा प्रकार समोर आल्याने सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे; जाणून घ्या, आणखी काय म्हटलं आहे शेतकऱ्याने आणि कोण आहेत हे शेतकरी?

Sampat Devgire

Maharashtra farmers News: शेतकरी कर्जमाफीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांमध्ये संताप दिसत आहे. त्याचे पडसाद विविध स्वरूपात उमटत आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघात एका शेतकऱ्याने या अनुषंगाने अजब मागणी केली आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे(Maikrao Kokate) यांना त्यांच्याच मतदारसंघातील एका शेतकऱ्याने घरचा आहेर दिला आहे. डॉ. विजय शिंदे या शेतकऱ्याने थेट मंत्री कोकाटे यांचे भेट घेतली. त्यांना एक विचित्र निवेदन दिल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

शासन कर्जमाफी करीत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे केवळ अशक्य बनले आहे. शेतकरी(Farmer) कर्जाच्या खाईत बुडालेला आहे. त्याला या संकटातून बाहेर काढणे आवश्यक आहे. मात्र योग्य उपायोजना सरकार करीत नसल्याचा राग डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

देशाच्या विविध भागात सरकार गांजाची शेती करण्यास शेतकऱ्यांना सरकार परवानगी देते. अशीच परवानगी सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात यावी. यासाठी त्यांनी ही परवानगी मागितली आहे. आम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे गांजाची शेती करून योग्य किमतीत त्याची विक्री करू. आर्थिक अडचणीतून मार्ग काढू, असे त्यांनी म्हटले आहे.

एवढंच नाहीतर ''नाशिकमध्ये(Nashik) आगामी काळात २०२७ मध्ये कुंभमेळा होत आहे. तिथे मोठ्या प्रमाणात साधू येतात. या साधूंना गांजाची आवश्यकता असते. कुंभमेळ्यात साधूना स्वस्त आणि चांगल्या प्रकारचा गांजा उपलब्ध करून देण्याची हमी आम्ही घेऊ.'', असेही डॉ. विजय शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कृषी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्ज माफी होईल अशी अपेक्षा होती. आता उपमुख्यमंत्री पवारांनी सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरावे असे फरमान काढले आहे. त्याचे तीव्र पडसादर राज्याच्या विविध भागात शेतकऱ्यांमध्ये दिसत आहेत. परिणामी शेतकरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर संतप्त दिसत आहे. यातूनच निर्माण झालेला राग शेतकऱ्यांनी सिन्नर मतदार संघात कृषिमंत्री कोकाटेंवर व्यक्त केल्याचे दिसत आहे. शेतकऱ्याची ही अजब मागणी आणि ती देखील थेट कृषिमंत्र्याच्या मतदारसंघातून झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT