Malegaon farmer
Malegaon farmer  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शेतकरी मारहाण; बाजार समितीने आडत्यांचे परवाने रद्द केले!

Sampat Devgire

मालेगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत (Malegaon APMC) शेतमाल लावण्याच्या वादातून दिलीप पवार (Farmer Deelip Pawar) या शेतकऱ्याला मारहाण करणे व्यापाऱ्यांना चांगलेच महाग पडले. कृषीमंञ्यांचे वर्चस्व असलेल्या समितीतच हा प्रकार घडला. त्यामुळे समितीने कठोर कारवाई करून यातील दोन्ही व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित (APMC suspend Licence of Traders) केले.

बाजार समितीतील धनश्री व्हेजीटेबल कंपनी व रेणुकामाता व्हेजीटेबल कंपनी या दोन्ही फर्मच्या भाजीपाला आडत व्यवसाय परवाना निलंबित केल्याची माहिती सचिव अशोक देसले यांनी कळविली आहे. या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

शेतकरी व व्यापारी यांच्यात झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत झाले. व्यापाऱ्याने शेतकऱ्याला मारहाण झाली. त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. यानंतर श्री. पाटील यांनी समितीकडे तक्रार दिली. बाजार समितीने धनश्री व्हेजीटेबल संस्थेला नोटिस बजावून सात दिवसात खुलासा करण्याची सूचना केली आहे. लेखी खुलासा समाधानकारक न वाटल्यास समितीचा गाळा ताब्यात घेऊन तुमचा परवाना रद्द केला जाईल असा इशारा दिला आहे. खुलासा करण्याचा अवधी संपण्यापुर्वीच याप्रश्‍नी रान उठण्याची शक्यता लक्षात घेऊन समिती प्रशासनाने दुसऱ्या दिवशीच परवाना रद्द केल्याची कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

समितीच्या भाजीपाला व फळे विभागातील या प्रकारात धनश्री व्हेजीटेबलसह रेणुकामाता फर्मच्या संचालकांचा मारहाणीत सहभाग असल्यामुळे त्याची चौकशी पुर्ण होईपर्यंत आजपासून दोन्ही फर्मचा भाजीपाला आडत व्यवसाय व खरेदीचा व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला. परवाना निलंबन काळात आडतीचा व्यवसाय करू नये व आडत गाळा बंद ठेवण्यात यावा अशा नोटीसा समितीकडून देण्यात आल्या आहेत. सुचनांचे उल्लंघन झाल्यास व्यापाऱ्याचा गाळा बाजार समिती ताब्यात घेईल.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT