Farmers with government officers
Farmers with government officers Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटेंच्या बैठकीतून शेतकरी निघून गेले

Sampat Devgire

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील प्रस्तावित अप्पर कडवा धरणाला (Uppar Kadwa damm) शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate), तहसीलदार, प्रांत आणि पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकत त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका अन पवित्रा पाहून भाविष्यात अप्पर कडवा धरणा विषयाचा संघर्ष अधिक पेटणार असल्याचे संकेत शेतकऱ्यांनी दिले आहेत.

इगतपुरी तालुक्यातील सोनोशी गावात असलेल्या संत निरंकार भवनमध्ये प्रस्तावित अप्पर कडवा धरण अन् अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत बैठक झाली. बैठकीची वेळ तीन वाजेची होती, पण अधिकारी वर्ग साडेतीनला अन आमदार कोकाटे साडेचारला हजर झाले. पण तत्पूर्वीच अनेक शेतकऱ्यांनी बैठकीतून काढता पाय घेत बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे आमदार कोकाटे तसेच संबधित अधिकारी वर्गाला कोणताही ठोस निर्णय घेता येऊ शकला नाही. इगतपुरी तालुक्यातील टाकेद खुर्द, घोरपडेवाडी, बारशिंगवे, आधारवड आणि खेडचा काही शेत जमिनीचा भाग प्रस्तावित अप्पर कडवा धरणात बाधित होणार आहे.

येथील अनेक कुटुंबाचा रोजगार जाऊ शकतो. कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे. जवळ्पास ६६५ हेक्टर शेत जमिनीचे क्षेत्र बाधित होइल. त्यामुळे आम्हाला शासनाचा मोबदला नको अन् धरणही नकोत अशी स्पष्ट भूमिका इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतलेली दिसते. दरम्यान इगतपुरी तालुक्यात दारणा, भावली, भाम, मुकणे, वैतरणा, कडवा अशी छोटी मोठी जवळपास १६ धरणे आहेत. अजून हे सतरावे धरण नको, इतकी धरणे असूनही आमचा घसा कोरडाच असतो. धरण उशाला अन् कोरड घशाला अशी आमची अवस्था असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT