Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शेतकऱ्यांमध्ये संकटे पार करण्याची ताकद!

Sampat Devgire

नाशिक : देशातील शेतकऱ्यांपुढे (Farmers) नैसर्गिक आणि कृत्रिम संकटे निर्माण होतात. त्यावर मात करण्यासाठी कृषिथॉनसारख्या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना ताकद आणि मार्गदर्शन मिळते, असे प्रतिपादन (Congress) राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी येथे केले. (Congress leader Balasaheb Thorat visit krishithon exhibition)

ह्यूमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्सतर्फे ठक्कर डोममध्ये भरलेल्या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात श्री. थोरात यांच्या हस्ते युवा सन्मान, युवा शेतकरी, उद्योजक, कार्यविस्तार पुरस्कार प्रदान करण्यात आले.

श्री. थोरात म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विकासासाठी विधायक कार्य करावे, या प्रेरणेतून कृषिथॉन प्रदर्शनाचे आयोजक न्याहारकर हे गेल्या २४ वर्षांपासून प्रयत्नशील आहेत.

देशातील छान कृषी प्रदर्शन आहे. सध्याच्या काळात शेतकऱ्यांकडून भात, ऊस, बांबू, डाळिंब, द्राक्ष, आंबा, केळी, कापूस, सोयाबीन, मोसंबी अशी विविध प्रकारची पिके राज्यातील अनेक भागात घेतली जातात. या पिकांना भाव मिळणे गरजेचे आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग व संशोधन करत जणूकाही कृषी विद्यापीठाचे कार्य करत असतात. याशिवाय फळबागा, फुलबागा, भाजीपाला, कांदा अधिक क्षेत्रात नाशिक जिल्ह्याने अग्रक्रम मिळविला आहे. यापुढे कोणत्याही पिकावर औषध फवारणी करणे म्हणजे मानवी आरोग्याला घातक ठरणारे आहे. त्यामुळे विषमुक्त पिकांना मागणी असणार आहे.

यावेळी आयोजक साहिल न्याहारकर, अश्‍विनी न्याहारकर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्रामीण महाव्यवस्थापक सत्यप्रकाश झा, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, कृषिथॉनचे आयोजक संजय न्याहारकर, अश्विनी न्याहारकर, साहिल न्याहारकर, संजय पाटील, माजी नगरसेवक डॉ. हेमलता पाटील, वत्सलाताई खैरे, ज्ञानेश्वर गायकवाड, राहुल दिवे, किरण सोनार, सतीश पाटील आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT