Trimbakeshwar Farmers Politics sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : मंत्री भुजबळांचा फोन आला... पण, स्वपक्षातील आमदाराला समस्याही सांगता येईना? शेतकऱ्यांवर कारवाई सुरूच राहण्याचे संकेत?

Trimbakeshwar Farmers Politics : नाशिक-त्र्यंबक रोड लगतच्या शेतकऱ्यांवर 'एनएमआरडीए'च्या कारवाईची टांगती तलवार कायम असून ज्या आमदारांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली त्यांना मात्र काहीच करता येईना असे झालं आहे.

Aslam Shanedivan

  1. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर शेतकऱ्यांवर एनएमआरडीएकडून मोबदला न देता कारवाई सुरू होती, त्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले.

  2. कैलास खांडबहाले यांनी उपोषण सुरू केले असताना, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हिरामण खोसकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

  3. अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या फोननंतर प्रशासनाने कारवाई थांबवली, पण आमदार खोसकर यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला नाही अशी चर्चा सुरू आहे.

Chhagan Bhujbal News : कुंभमेळ्यासाठी त्रंबक रोडचे रुंदीकरण प्रस्तावित आहे. 'एमएमआरडीए'त्यासाठी रस्त्याच्या 50 मीटर पर्यंत पाडकाम करीत आहे. प्रशासनाची ही कारवाईच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार हिरामण खोसकर आणि आमदार सरोज अहिरे यांच्या मतदार संघातील हा परिसर आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून काहीही दिलासा मिळाला नाही. दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाई थांबविण्याचे आदेश दिले. मात्र अधिकाऱ्यांनी तो आदेश जुमानला नाही.

दोन दिवसांपूर्वी शेकडो महिला आणि शेतकरी रस्त्यावर उतरले. यावेळी आंदोलन संताप व्यक्त केला. आमदार खोसकर देखील त्यात होते. विनोद नाठे या कार्यकर्त्यांने आमदारांना स्पीकर ऑन करून अधिकाऱ्यांना फोन करायला लावला. यावेळी आमदारांनी आंदोलक संतप्त आहे. त्यांच्या भावना समजून घ्याव्यात. ऐन दिवाळीत त्यांना प्रशासनाने रस्त्यावर आणले आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्याच मालकीच्या जमिनीतून हद्दपार करू नये, अशी विनंती केली. संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र न्यायालयाकडून स्टे आला आहे. त्यामुळे कारवाई थांबली असे विधान केले. आज आमदार खोसकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय जाहीर केला. उद्या राजभवन येथे होणाऱ्या कार्यक्रमात त्र्यंबक रोडच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाईल. माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे, डॉ. डी. एल. कराड यांसह विविध नेते उपोषण स्थळी होते.

दुपारी आमदार खोसकर कैलास खांडबहाले यांच्या उपोषणस्थळी आले. यावेळी अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना फोन केला. फोनवर नेमकी मागणी काय हे सांगताना बराच गोंधळ उडाला. यावेळी भुजबळ यांच्याकडून प्रशासनाने ही कारवाई थांबवली आहे, असा फीडबॅक दिल्याचे सांगितले. प्रश्न नेमका काय हे सांगण्यासाठी तानाजी जायभावे यांना फोन दिला असता तो कट झाला.

प्रशासनाचा दबावामुळे आणि पोलीस बंदोबस्तात दिल्या जाणाऱ्या धमक्या यातून शेतकरी वर्गात प्रचंड घबराट पसरली आहे. शेकडो शेतकरी आणि नागरिकांनी कोट्यावधी रुपयांची बांधकामे आणि दुकाने या दबावातून पाडली. जे पाडणार नाही त्यांना महिला अधिकारी थेट जेसीबी आणून आणि प्रचंड फौज फाटा घेऊन धमकावत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या.

महापालिका हद्दीत साडेबावीस मीटरची मर्यादा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला रुंदी करण्यासाठी कोणतीही अधिकची जमीन नको आहे. असे असताना एमएनआरडीए मात्र वरिष्ठ आणि मुख्यमंत्र्यांना वेगळीच माहिती देत असल्याचा संशय आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

FAQs :

1️⃣ शेतकऱ्यांचे आंदोलन कशासाठी सुरू झाले?
एनएमआरडीएने मोबदला न देता जमिनीवर कारवाई सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

2️⃣ कैलास खांडबहाले यांनी काय केले?
ते या कारवाईविरोधात उपोषणास बसले आहेत.

3️⃣ छगन भुजबळ यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?
भुजबळ यांनी फोन करून प्रशासनाला कारवाई थांबवण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.

4️⃣ हिरामण खोसकर यांच्याबाबत काय चर्चा आहे?
शेतकऱ्यांचा प्रश्न स्पष्टपणे मांडण्यात ते अपयशी ठरल्याची चर्चा सुरू आहे.

5️⃣ सध्या परिस्थिती काय आहे?
प्रशासनाने कारवाई तात्पुरती थांबवली असून शेतकऱ्यांचे उपोषण अद्याप सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT