Girish Mahajan Nashik News: सिंहास्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे शेतकरी बेघर आणि भूमिहीन होणार असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्याचा प्रत्यय कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनाही आला.
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन या भागाचा दौरा करणार असल्याने सकाळपासूनच महिला आणि शेतकरी प्रतीक्षा करीत होते. मंत्री महाजन सायंकाळी या भागाला भेट देण्यासाठी आले. यावेळी प्रत्येक शेतकऱ्याची आपल्या भागात मंत्र्यांनी थांबून पाहणी करावी अशी अपेक्षा होती.
नाशिक ते त्र्यंबकेश्वर असा प्रवास करताना दोन ते तीन ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. अधिकाऱ्यांना रस्त्याचे प्रत्यक्ष मोजमाप करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी स्वतःही रस्त्याच्या दुतर्फा मोजणी करून संभाव्य नुकसानीचा अंदाज घेतला.
नाशिक ते त्र्यंबकेश्वर या बारा किलोमीटर परिसरात पाडकाम झाले. त्या तीन ठिकाणी प्रत्यक्ष माहिती घेतली. मात्र मंत्र्यांनी प्रत्येक गावात थांबून चर्चा करावी असा असा लोकांचा आग्रह होता. यावेळी अंजनेरी येथे अनेक शेतकरी बेघर होणार असल्याने ते रस्त्यावर थांबून होते.
अंजनेरी येथून जाताना मंत्री महाजन यांचा ताफा वेगात पुढे जात होता. ते थांबणार नाहीत असा अंदाज आल्याने महिलांनी आणि शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन त्यांची गाडी अडवली. अचानक झालेल्या या घटनेने अधिकारी आणि पोलिसांची ही तारांबळ उडाली.
यावेळी कल्पना हरिश्चंद्र चव्हाण या महिलेने मंत्री महाजन यांना गाडीतून उतरावे आणि प्रत्यक्ष स्थिती पहावी असा आग्रह धरला. मात्र मंत्री महाजन यांनी गाडीतूनच छोटी छोटी दुकाने आहेत. ती पाडायची नाही असा आग्रह मान्य होण्यासारखा नाही असे सांगितले.
कल्पना चव्हाण आणि विमल शिवाजी चव्हाण यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. आम्ही या कारवाईने बेघर आणि भूमिहीन होणार आहोत. आमच्या पुढे जगण्याचा गंभीर पेच निर्माण झाला आहे. आमच्याच वाढ वडिलांच्या गावात आमच्यावर ही वेळ आली, असे सांगितले.
कल्पना चव्हाण यांची रस्त्यालगत चार गुंठे जागा आहे. त्यातच त्यांचे दुकान आणि घर आहे. एनएमआरडीए च्या कारवाईने त्या बेघर आणि भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे त्यांचे भवितव्य संकटात आहे. यासंदर्भात त्यांनी आपली कैफीयत मांडली.
श्रीमती चव्हाण यांनी मंत्री महाजन यांच्याकडे आपली कैफियत मांडली. आजच आमची स्थिती विदारक आहे. आमच्या मुलांना लग्नासाठी कोणीही मुली देत नाहीत. रस्ता रुंदी करण्याच्या निमित्ताने बेघर करून आमच्या मुलांनी चोऱ्या करायच्या का? त्यांचे भवितव्य काय होणार? असा असहाय प्रश्न केला.
यावेळी परिसरातील महिला आणि शेतकऱ्यांनीही त्यांचे समर्थन आणि सांत्वन केले. मंत्री महाजन शेतकरी आणि महिलांची गाडी बाहेर गर्दी असल्याने गाडीतच बसून होते. त्यांनी संबंधितांना माहिती देत त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र त्यांनी गर्दीतून आपली सुटका करून घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.