Accuse police constable & Crowd
Accuse police constable & Crowd Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

जुगारी पोलिसाच्या चाकु हल्ल्यात सासरा ठार, पत्नी, सासु जखमी!

Sampat Devgire

नाशिक : जुगाराचे (Gambling) व्यसन असलेल्या पोलिसाने (Police) पत्नी नांदण्यास येत नसल्याने संताप केला. त्यातच त्याने पत्नीवर चाकू हल्ला केला. सासरे वाचविण्यास आल्याने ते ठार झाले. पत्नी व सासु गंभीर जखमी झाले. या संशयीताच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको (Agitation) केल्याने सिन्नर फाटा भागातील वाहतूक ठप्प झाली.

घटना अशी की, शहरातील उपनगर येथे वास्तव्य असलेले पोलिस शिपाई सूरज देविदास उगलमुगले सध्या ते मनमाड पोलीस ठाण्यात दंगा नियंत्रण विभागात कार्यरत आहेत. त्यांना जुगाराचे व्यसन होते. त्यामुळे त्यांच्या पत्नीशी त्यांचे वारंवरा खटके उडत होते. भांडण झाल्याने पत्नी पुजा हीने याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार देखील केली होती. मात्र पोलिसांनी अदखलपात्र तक्रार म्हणून त्याची नोंद केली होती. काही दिवसांपासून पूजा माहेरी दोडी-दापूर येथे वडिलांकडे रहायला आली होती.

शनिवारी सायंकाळी पोलिस शिपाई उगलमुगले दोडी येथे सासऱ्यांकडे गेले. तीथे त्यांनी पत्नीशी वाद घालायला सुरवात केली. तुला काल सायंकाळी घरी यायला सांगितले होते. तु का आली नाही? याचा जाब विचारत शिविगाळ सुरु केली. त्यांच्या सोबत त्यांचे दोन मित्र देखील होते. त्यानंतर सूरज उगलमुगले याने खीशातील चाकू काढला व पत्नीवर वार केला. तेव्हा सासरे निवृत्ती दामोदर सांगळे (५८) यांनी हस्तक्षेप करून मुलीला बाजुला केले. त्यामुळे संतापलेल्या सूरजने सासऱ्यावर चाकुने सपासप वार केले. सासरे जमीनीवर कोसळले. तेव्हा त्याने पुन्हा पत्नीवर हल्ला केला. तेव्हा सासू मधे पडल्यान सासुवरही चाकुचे वार केले. हा गोंधळ व आरडा ओरड एैकायला आल्याने शेजारचे ग्रामस्थ घटनास्थळी धावले. तेव्हा पोलिस शिपाई उगलमुगले पसार झाले.

जखमींना नाशिक रोडच्या सिन्नर फाटा येथील साई केअर रुग्णालयात दाखल केले. त्यात सकाळी सासरे निवृत्ती सांगळे (वय ५२) यांचे निधन झाले. पोलिसाची पत्नी पुजा (वय २५) आणि सासु शिला (वय ४५) गंभीर जखमी आहेत. सांगळे यांचे निधन झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. जोपर्यंत संशयीत आरोपी उगलमुगले याला अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्करा करणार नसल्याचे जाहीर केले. सहाय्यक आयुक्त माधुरी कांगणे आणि पोलिस निरीक्षक तांबे यांनी मध्यस्थी केली. ग्रामस्थांची समजुत काढल्यावर मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविला.

पोलिस निरीक्षकावर कारवाई करा

या धक्कादायक घटनेत कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसानेच चाकूने सपासप वार करुन पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. सासऱ्याची हत्या केली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत वावी (सिन्नर) पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी सुरज उगलमुगले फरार झाला आहे. यापूर्वी पत्नीने शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यावर पोलीस निरीक्षक निलेश माईणकर यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांनाही या प्रकरणात सह आरोपी करावे अशी मयताच्या नातेवाईकांनी मागणी केली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT