इगतपुरी : राज्यातील धार्मिक व पर्यटन क्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ रोवून शेतीकडे वळणाऱ्या युवा पिढीला सलाम करावासा वाटतो, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governer Bhagatsingh Koshiyari) यांनी येथे केले.
राज्यपाल कोश्यारी यांनी रविवारी वैतरणा-त्र्यंबकेश्वर महामार्गावरील हळदी प्लांटला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, शाश्वत शेती व समृद्ध शेतकरी यांसह शेतीपूरक व्यवसायात महाराष्ट्र (Maharashtra) राज्य पुढे आहे. आधुनिक पद्धतीने शेती करूनही अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला येतो. नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक कृषी उत्पन्न वाढवून शेतकऱ्यांना फायदा कसा होईल, याकडे लक्ष केंद्रित केले जाईल.
राज्यपाल पुढे म्हणाले, अत्यंत कमी क्षेत्रावर जास्तीचे उत्पादन घेऊन लागवडखर्च कमी करण्यासाठी इजराईल पद्धतीने राज्यात २७ ठिकाणी ॲग्री एक्वा लॅप या कंपनीने प्लांट सुरू केले आहेत. कमी क्षेत्रातील शेतकऱ्यांनादेखील यातून मोठा फायदा होणार असून, एकदाच केलेली डेव्हलपमेंट मटेरिअल तब्बल ७० वर्षांपर्यंत कामी पडू शकते, असा विश्वास कंपनीचे अध्यक्ष डॉ. झाडे यांनी व्यक्त केला.
ॲग्री एक्वा लॅप कंपनीच्या संपूर्ण पीक पद्धतीसह मत्स्यपालन, हळद उत्पादन, बागायती पिके यांचे बारकाईने निरीक्षण करून कृषी अधिकाऱ्यांकडून राज्यपालांनी माहिती समजून घेतली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, राज्यपाल प्रबंधक राकेश नतानी, परिसहाय्यक राजेंद्र सिंग, विशेष अधिकारी उमेश काशिकर, कृषी अभ्यासक डॉ. प्रशांत झाडे, डॉ. हिरेन पटेल, रोहित लोणकर, डॉ. साईनाथ हाडोळे, तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर या वेळी उपस्थित होते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.