Ex MLA Anil Kadam at Ozar in Bullock cart race.

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

टांगा शर्यत; परवानगीनंतर पहिला गुन्हा शिवसेनेचे अनिल कदम यांच्यावर!

नियोजनाअभावी टांगा शर्यतीचा वारू उधळला, नंतर पोलिसांनी दाखल केला गुन्हा.

Sampat Devgire

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना (Bullock cart race) सशर्त परवानगी दिली. त्यानंतर लगेचच शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार अनिल कदम यांच्या पुढाकाराने ओझरला ही शर्यत झाली. त्याला तांगा शौकिनांची गर्दीही मोठी झाली. मात्र या अनियंत्रीत गर्दीने या शर्यतीचा निरस केला. एव्हढ्यावर न थांबता पोलिसांनी याबाबत माजी आमदार कदम (Anil Kadam) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने त्यामुळे प्रतिष्ठेसाठी झालेली टांगा शर्यतीचा वारू उधळला.

या संदर्भात विना परवानगी शर्यतीचे आयोजन व त्यात सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन झाल्याने माजी आमदार अनिल कदम यांसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व शर्ती मोडल्याने पोलिसांनी कारवाई केली. बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर राज्यातील पहिला गुन्हा सत्ताधारी शिवसेनेच्याच माजी आमदारावर दाखल झाला. यात मुख्यमंत्र्यांच्या सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर हे नियम पायदळी तुडवल्याने तो राजकिय चर्चेचा विषय बनला.

ओझर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम १८८, २६९, २७० प्रमाणे गुन्हा दाखल झाला. त्यात माजी आमदार कदम, आशिष शिंदे, स्वप्नील कदम, शिवाजी शेजवळ, हर्षल चौधरी, महेश शेजवळ, पिंटू शिंदे, अनिल सोमासे, संजय भिकुले, अमोल भालेराव यांचा समावेष आहे. विशेष म्हणजे शर्यत झाली ओझरला आणि तक्रार केली मोरवाडी (नाशिक) येथील पुरुषोत्तम दगु आव्हाड यांनी.

ओझर शिवसेना व युवासेनेतर्फे ओझरच्या दहावा मैल येथे बैलगाडा शर्यतीचे नियोजन होते. त्याची प्रसिद्धीही सोशल मीडियावर करण्यात आली होती. त्यात सकाळी दहाला सुरू होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्‌घाटन माजी आमदार कदमांच्या उशिरा येण्याने प्रत्यक्षात दुपारी दोनच्या सुमारास झाले. तोपर्यंत टांगा शौकिन आणि उपस्थितांची सहनशीलता संपुष्टात येऊ लागली होती. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन बैलगाडा मालकांना माईकवर आवाहन करताना उद्घोषकांचे घसे कोरडे पडले तरी प्रतिसाद मिळेना. दुपारचे तीन वाजले तरी शर्यतीला रंग चढेना, तोपर्यंत परिसरातील टांगा शौकिनांच्या गर्दीने मैदान गच्च झाले होते.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ना पोलिसांची कुमक ना आयोजकांकडून व्यवस्था. अशा परिस्थितीत बैलगाडा मालकांनाही काही सुचेना. काही वेळाने शर्यतीच्या नियमांचे पालन होत नसल्याचे सांगत पोलिसांनी हस्तक्षेप करीत स्पर्धा थांबवली. त्यामुळे बैलगाडा मालकांसह शौकिनांचा चांगलाच हिरमोडा झाला.

एव्हढ्या मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतीचे आयोजन असताना माजी आमदार अनिल कदमांसह आयोजकांनी खेळाच्या ठिकाणी कुठल्याही उपाययोजना केलेल्या नव्हत्या, असे पोलिसांनी सांगितले. स्वयंसेवकांच्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले असते. राजकीय मैदानातील डावपेच ज्ञात असलेल्या कदमांना आपल्याच कर्मभूमित भरविलेल्या बैलगाडा शर्यती यशस्वी करणे शक्य होते. मात्र उत्साही गर्दीवर संयोजकांना नियंत्रण ठेवता आले नाही.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT