Ahmednagar BJP Politics  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar BJP Politics : 'नगरी' ग्राऊंडवर गुजरातची 'फिल्डिंग'; भाजपचा 'पॅर्टन' ठरणार का यशस्वी?

BJP fielded Gujarat MLAs for organizational building in 13 assembly constituencies in Ahmednagar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अहमदनगर जिल्ह्यातील 13 विधानसभा मतदारसंघामध्ये गुजरातचे आजी-माजी आमदार संघटनात्मक कामकाजासाठी उतरवले आहेत.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : विधानसभा निवडणुकीत कोणताही गाफिलपणा पत्करण्यास भाजप तयार नाही. सूक्ष्म प्लॅनिंगमध्ये भाजप असल्याचे दिसते. राज्यातील स्थानिक नेते वादापासून दूर राहताना दिसत असून, गाऊंडवरील काम गुंतलेत. संघटनात्मक बांधणी करत आहे.

यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी गुजरातमधील आजी-माजी आमदार, माजी मंत्री महाराष्ट्रातील मैदानात उतरले आहे. नगर जिल्ह्यातील 13 विधानसभा मतदारसंघात संघानात्मक बांधणीसाठी गुजरातमधील आजी-माजी 13 आमदारांनी तळ ठोकला आहे. 'नगरी' मैदानावर गुजरातची ही फिल्डिंग किती ताकदीची ठरणार, याची आता चर्चा सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुती भाजपला महाराष्ट्रात चांगलाच फटका बसला. महाविकास आघाडीने राज्यात चांगले यश मिळवले. महाराष्ट्रातील बदलाचा हा फटका देशपातळीवर बसू लागल्याने भाजपने विधानसभा निवडणुकीत हे अपयश पुसून टाकण्याची तयारी केली आहे. यासाठी भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीत लक्ष घातले आहे. नगर जिल्ह्यातील 13 विधानसभा मतदारसंघात गुजरातमधील आजी-माजी आमदारांना अमित शाह (Amit Shah) यांनी मैदानात उतरवले आहे. हे 13 आजी-माजी आमदार संघटनात्मक बांधणी करणार आहेत.

या गुजरातमधील आजी-माजी आमदारांना बुधवारी नाशिकमध्ये बोलावून घेण्यात आलं होतं. त्यातील आमदारांना नगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची माहिती देण्यात आली. हे आमदार स्थानिक पातळीवरील बूथ केंद्रप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते, निरीक्षक आणि सर्वसामान्यांशी संवाद साधणार आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांनाही भेटून भाजपसाठी (BJP) समर्थन मिळावे म्हणून गाठीभेटीवर भर देणार आहेत. यानंतर हे आमदार आपला अहवाल तयार करून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे देणार आहेत.

या आमदारांची नियुक्ती

नगरमध्ये नियुक्त केलेले गुजरामधील आमदार पुढीलप्रमाणे : कन्हैया लाल किशोरी (अकोले), जगदीश मकवाना (संगमनेर), राजेंद्र त्रिवेदी (शिर्डी), सनमभाई पटेल (कोपरगाव), गणेश बिरारी (श्रीरामपूर), नैलेश शहा (नेवासा), प्रवीण माळी (शेवगाव), महेंद्र पटेल (राहुरी), बिपीन सिक्का (पारनेर), महेश कासवाल (अहमदनग), देवाशू देसाई (श्रीगोंदा), अनिरुद्ध दिवे (कर्जत जामखेड).

शाह-विखे पर्व

भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून नगर जिल्ह्याचे भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी भेट पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी जवळीक वाढली आहे. मंत्री विखे दिल्ली गेल्यावर त्यांची अमित शाह यांच्याशी भेट नक्की असते. यातच गुजरातमधील 13 आमदार भाजपच्या संघटनात्मक बांधणीसाठी मंत्री विखेंच्या नगर जिल्हा बालेकिल्ल्यात आल्याने राजकीय चर्चांना पेव फुटले आहे. या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात शाह-विखे पर्व दिसणार असे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT